केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ

केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CPTआप्रविको: FACT) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून २० किमी आग्नेयेस आहे. हा दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. केप टाउन-जोहान्सबर्ग हा मार्ग जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. २०११मध्ये ४५ लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला होता. केप टाउन पासून दक्षिण आफ्रिकेतील बव्हंश शहरांना तसेच आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

इतिहास

संपादन

केप टाउन विमानतळ १९५४मध्ये प्रवाशांसाठी खुला झाला. त्यावेळी याला तत्कालीन पंतप्रधान डी.एफ. मलानचे नाव देण्यात आले होते. तेव्हा येथून एक थेट लंडन तर दुसरी जोहान्सबर्गमार्गे लंडन अशा दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा होत्या.[] १९९० च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपुष्टात आल्यावर या विमानतळाची मालकी सरकारकडून नव्याने उभारलेल्या एरपोर्ट्स कंपनी ऑफ साउथ आफ्रिकाकडे हस्तांतरित झाली[] व विमानतळाचे नाव राजकीयदृष्ट्या तटस्थ असे केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आले.[] या विमानतळावरून २००-४-५मध्ये ६२ लाख, २००७-०८मध्ये ८४ लाख तर २००८-०९मध्ये ७८ लाख प्रवाशांनी ये-जा केली. २०१६मध्ये १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी या विमानतळाचा उपयोग केला.

२०१० फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. त्यावेळी १.६ अब्ज रॅंड[] खर्च करून आंतरराष्ट्रीय आणि अंतर्देशीय टर्मिनलांना जोडणारे मध्य टर्मिनल उभारण्यात आले. २०१८ च्या शेवटी येथे दुसरी धावपट्टी बांधणे सुरू होईल.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
 
मे २०१०मध्ये एर नामबियाचे बोईंग ७३७-५०० केप टाउन विमानतळावर
 
२०११मध्ये टर्किश एरलाइन्सचे एरबस ए३३०-३०० येथून उड्डाण करताना
 
२०११मध्ये लुफ्तांसाचे बोईंग ७४७-४००
 
एमिरेट्सचे बोईंग ७७७-२०० येथे उतरताना
विमानकंपनी गंतव्यस्थान 
एर बोत्स्वाना गॅबोरोन (तात्पुरती स्थगित)[]
एर फ्रांस पॅरिस-चार्ल्स दि गॉल (२९ मार्च, २०१८ पर्यंत)[]
एरलिंक जॉर्ज, किंबर्ली, मॉन, नेल्सप्रुइट, पीटरमारित्झबर्ग, प्रिटोरिया (८ मे, २०१८ पर्यंत)[], स्कुकुझा, अपिंग्टन, व्हिक्टोरिया फॉल्स, विंडहोक-होसेआ कुटाको
एर मॉरिशस मॉरिशस
एर नामिबिया वाल्विस बे, विंडहोक-होसेआ कुटाको
ऑस्ट्रियन एअरलाइन्स मोसमी: व्हियेना (२८ ऑक्टोबर, २०१८ पासून पुन्हा सुरू)[]
ब्रिटिश एरवेझ दरबान, जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो, लंडन-हीथ्रो, पोर्ट एलिझाबेझ
मोसमी: लंडन-गॅटविक
कॅथे पॅसिफिक मोसमी: हाँग काँग (१३ नोव्हेंबर, २०१८ पासून)[]
सेनएर प्लेटेनबर्ग बे, होड्सप्रुइट[१०]
कॉंडोर मोसमी: फ्रांकफुर्ट
एडेलवाइस एर मोसमी: झ्युरिक
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय
इथियोपियन एअरलाइन्स अडिस अबाबा
युरोविंग्ज मोसमी: कोलोन-बॉन[११][१२](३० एप्रिल, २०१८ पर्यंत)[१३]
फ्लायसाफेर दरबान, ईस्ट लंडन, जोहान्सबर्ग–लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो, पोर्ट एलिझाबेथ
मोसमी: जॉर्ज
जून पॅरिस-चार्ल्स दि गॉल (१ एप्रिल, २०१८पासून)[१४]
केन्या एरवेझ लिविंग्स्टन, नैरोबी-जोमो केन्याटा1, व्हिक्टोरिया फॉल्स
केएलएम ॲम्स्टरडॅम
कुलुला.कॉम दरबान, जोहान्सबर्ग-लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट
मोसमी: म्युन्शेन
मॅंगो ब्लूमफॉंटेन, दरबान, जोहान्सबर्ग-लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो, पोर्ट एलिझाबेथ
कतार एरवेझ दोहा
ऱ्वांडाएर किगाली, हरारे2 (१६ मे, २०१८पासून)[१५]
सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर3
साउथ आफ्रिकन एरवेझ जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो
साउथ आफ्रिकन एक्सप्रेस ब्लूमफॉंटेन, दरबान, ईस्ट लंडन, होड्सप्रुइट, पोर्ट एलिझाबेथ, सन सिटी, वाल्विस बे
टाग ॲंगोला एअरलाइन्स लुआंडा
थॉमस कूक एअरलाइन्स मोसमी: लंडन गॅटविक, मॅंचेस्टर[१६]
टर्किश एअरलाइन्स इस्तंबूल–अतातुर्क
वेस्टएर एव्हियेशन विंडहोक-ईरोस4 (१ एप्रिल, २०१८ पासून)[१७]
नोंदी
  • ^1 व्हिक्टोरिया/लिविंग्स्टन येथे थांबा.
  • ^2 किगालीला ये-जा करणारी सेवा हरारे येथे थांबते. हरारे आणि केप टाउन दरम्यान प्रवाशांची ने-आण करण्यास मुभा आहे.
  • ^3 जोहान्सबर्गमध्ये थांबा परंतु केप टाउन-जोहान्सबर्ग प्रवाशांना चढ-उतर करण्यास मनाई.
  • ^4 : हे विमान पुढे ऑरेन्यामुंड पर्यंत जाते परंतु केप टाउन पासूनचे थेट प्रवासी नेता येत नाहीत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ बिकफर्ड-स्मिथ, विव्हियन; E. Van Heyningen; Nigel Worden. Cape Town in the twentieth century: an illustrated social history. Cape Town. pp. १२०. 28 December 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "ACSA – History". Airports Company South Africa. 20 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 December 2009 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  3. ^ "Cape Town Airport (CPT) Information – Airports Guide to Cape Town". 28 December 2009 रोजी पाहिले.
  4. ^ निकोल्सन, झारा (8 November 2009). "New terminal hailed as a success". Sunday Argus. IOL. 28 December 2009 रोजी पाहिले.
  5. ^ http://www.traveller24.com/News/Flights/update-air-botswana-pulls-cape-town-route-on-the-back-of-cemair-grounding-20180216
  6. ^ http://www.heraldlive.co.za/news/2017/12/02/cape-town-voted-worlds-best-city/
  7. ^ http://www.traveller24.com/News/Flights/airlink-suspends-pretoria-to-cape-town-service-20180306
  8. ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/273685/austrian-resumes-cape-town-service-from-oct-2018/
  9. ^ Cathay Pacific to fly non-stop to Cape Town from November
  10. ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/272735/cemair-adds-hoedspruit-service-from-august-2017/
  11. ^ https://www.eurowings.com/en/booking/offers/flights-from/ZA/CPT/to/DE/CGN.html
  12. ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/271958/eurowings-plans-cape-town-launch-from-nov-2017/
  13. ^ http://www.aero.de/news-28718/Eurowings-legt-Langstreckenziele-ab-Duesseldorf-fest.html
  14. ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/276180/joon-s18-expansion-as-of-12dec17/?highlight=cape%20town
  15. ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/277172/rwandair-adds-new-african-destinations-in-2q18/
  16. ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/270885/thomas-cook-schedules-manchester-cape-town-jan-2018-launch/
  17. ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/277454/westair-aviation-outlines-preliminary-scheduled-service-from-april-2018/