इथियोपियन एअरलाइन्स (अम्हारिक: የኢትዮጵያ አየር መንገድ; የኢትዮጵያ) ही इथियोपिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. अदिस अबाबाजवळील अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली इथियोपियन एअरलाइन्स १९४५ साली स्थापन करण्यात आली. इथियोपियन एअरलाइन्स आफ्रिकेमधील सर्वात मोठ्या व सर्वोत्तम विमानकंपन्यांपैकी एक असून ती २०११ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या इथियोपियन एअरलाइन्सद्वारे देशांतर्गत १९ शहरांना तर जगातील ६३ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते. भारतामधील दिल्ली, मुंबईचेन्नई विमानतळांवर इथियोपियनची प्रवासी व मालवाहतूक सेवा कार्यरत आहे.

इथियोपियन एअरलाइन्स
Ethiopian Airlines Logo.svg
आय.ए.टी.ए.
ET
आय.सी.ए.ओ.
ETH
कॉलसाईन
ETHIOPIAN
स्थापना २१ डिसेंबर १९४५
हब अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर शेबामाइल्स
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ७७
गंतव्यस्थाने १०१ (प्रवासी)
२३ (माल)
ब्रीदवाक्य The New Spirit of Africa
पालक कंपनी इथियोपिया सरकार
मुख्यालय अदिस अबाबा, इथियोपिया
संकेतस्थळ http://ethiopianairlines.com/
फ्रांकफुर्ट विमानतळावरील इथियोपियन एअरलाइन्सचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान

इतिहाससंपादन करा

पूर्वी ही कंपनी संपूर्णपणे देशातील सरकारच्या मालकीची असून इथियोपियाची ध्वज वाहक कंपनी होती.[१] ह्या कंपनीची स्थापना २१ डिसेंबर १९४५ रोजी झालेली असुन ८ एप्रिल १९४६ पासून कंपनी कार्यान्वीत करण्यात आली व १९५१ पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची विस्तारणा करण्यात आली. १९६५ पासून या कंपनीला शेअर कंपनीमध्ये भा गीदारी मिळाली आणि त्यानंतर इथियोपियन एअर लाइन्स हे नाव बद्लुन इथियोपियन एअरलाइन्स ठेवण्यात आले. १९५९ पासून हे हवाई परिवहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना[२] ह्यांचे सदस्य बनले.

या कंपनीचे मुख्य कार्यालय[३] बोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, आदिस अबाबा येथे असून ८२ ठिकाणच्या प्रवाशांना या कंपनीमार्फत प्रवासासाठी सेवा दिली जाते. या कंपनीची १९ स्वदेशी आणि २३ मालवाहू बोटी आहेत . इथियोपियन एअरलाईन्स इतर एअरलाईन्सच्या तुलनेत आफ्रिकामध्येच अंतर्गत प्रवास सेवा देते. ही या उद्योगातील वेगाने वाढणा-या कंपन्यापैकी एक मानली जाते आणि आफ्रिका खंडातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ही एक उपखंडातील फायदेशीर हवाई कंपनी आहे .या हवाई कंपनीच्या जहाजी माल विभागाला "आफ्रिकन जहाजी माल हवाई कंपनी"[४] या पुरस्काराने वर्ष २०११ मध्ये सन्मानित करण्यात आले.

२०१० मध्ये इथियोपियनने "परिकल्पना २०१०" आत्मसात केली. ही १५ वर्षाची विकास धोरण योजना होती. सदर योजनेव्दारे या कंपनीला १२० इतका वेग , ९० प्रवासाची ठिकाणे ,१८ कोटीहून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता विकसित करावयाची आहे तसेच ७२०००० टन्स माल वाहतूक करावयाची असून १७०००[५] कर्मचारी या विमान कंपनीमध्ये रोजगार मिळवतील अशी अपेक्षा आहे.१३ ज़ुलै २०१३ रोजी इथियोपियाने करारावर स्वाक्षरी करुन मालाविया वाहक हवाई कंपनीचा ४९% भाग संपादन केला. या नवीन विमान कंपनीला मालविया विमान कंपनी असे नाव देण्यात आले. मालविया विमान कंपनी जानेवारी २०१४ मध्ये[६] कार्यान्वीत झाली.

मुख्य कार्यालयसंपादन करा

सध्या इथियोपियन हवाईकंपनीचे मुख्य कार्यालय बोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, आडिस अबाबा[७], येथे आहे. नवीन मुख्य कार्यालय बांधण्याचा या कंपनीची भविष्यातील योजना आहे. त्यासाठी 2009 मध्ये या कंपनीच्या नवीन कार्यालयाचा आराखडा बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पण त्यातील कोणताही आराखडा मंजूर झाला नव्हता. १६ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांनी पुन्हा दुसरी फेरी घेण्याचे ठरविले आणि सप्टेंबर २०११ मध्ये BET या वास्तुविशारदाने स्पर्धा जिंकल्याची घोषणा केली. या हवाई कंपनीने बोले आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूखंडावर अंदाजे ३०० कोटी (५,४०,००० वर्गफुट) इतक्या खर्चाचे मुख्य कार्यालय बांधायला सुरुवात केलेली आहे.

गंतव्यस्थानसंपादन करा

सप्टेंबर २०१४ पासून ८३ आंतरराष्ट्रीय प्रवासी गंतव्यस्थानकांचा आणि २० स्वदेशी गंतव्यस्थानकांचा तसेच यूरोप आणि अमेरिकातील १३ तसेच मध्य पूर्व आणि एशियामधून २१ अशा आफ्रिकेतील ४९ शहराचा ( इथिओपियाला वगळून) समावेश झाला. आफ्रिकातील स्थानकांवर[८] १५, एशिया आणि मध्य पूर्वेतील ७ तसेच यूरोपातील २ अशा २४ ठिकाणी या कंपनीकडून सेवा दिली जाते. अनेकदा इथियोपियन कंपनी आफ्रिकेतील स्थानकांवर प्राधान्याने सेवा पुरवीते. त्यानंतर बाकीच्या हवाई कंपनीना प्राधान्य दिले जाते.

अलीकडील विकाससंपादन करा

फेब्रुवारी २००५ मध्ये इथियोपियन हवाई कंपनीने ७८७ बोईंग ड्रीमलाइनर[९] खरेदी करण्याकरीता व आफ्रिकेतील पहिले वाहक बनविण्याकरीता करारावर स्वाक्षरी केली.

सेवासंस्थासंपादन करा

इथियोपियन हवाई कंपनीच्या विमानांमध्ये क्लाउड नाइन[१०] या नावाचा बिझनेस व आणि इकॉनॉमी वर्ग असे दोन वर्ग उपलब्ध आहेत.[११]

अन्न आणि पाणीसंपादन करा

सगळ्या विमानांमध्ये प्रवाश्यांना खादयपदार्थ आणि शीतपेये उपलब्ध करून दिली जातात. गरम जेवण, गरम किवा थंड खाद्यपदार्थ किंवा हलका फराळ याचा समावेश त्यांच्या खादयपदार्थामध्ये आहे. उड्डाणांच्या पल्ल्यावर आणि वेळेवर खादयपदार्थ अवलंबून आहेत. ज्यादा दराने मागणी असलेले पेय उपलब्ध करुन दिले जाते. एकापेक्षा अनेक ठिकाणी प्रवास करणा-या प्रवाशांना विशेष जेवणाची सोय सुद्धा करुन दिली जाते.

विश्राम कक्षसंपादन करा

बोले आंतरराष्ट्रीय विमानतळावर इथियोपियन विमान कंपनी प्रवाशांना दोन प्रकारची विश्राम कक्ष उपलब्ध करते . क्लाउड नाइनचे प्रवासी क्लाउड नाइन विश्राम कक्षामध्ये उड्डाणाच्या[१२] निर्गमनासाठी प्रतीक्षा करू शकतात. त्यांना विविध सुविधा पूरविल्या जातात. तसेच वैयक्तिक संगणक आणि वायरलेस कनेक्शन देखिल उपलब्ध करुन दिले जाते.

संदर्भसंपादन करा

 1. ^ "इथियोपियन विमान कंपनीने सिंगापूर बरोबर एशियाई विस्तारणा सुरू केली नस्थिरावता चांगीच्या आवश्यक प्रोत्साहनासाठी" (इंग्लिश मजकूर). 
 2. ^ "AFRAA वर्तमान सदस्य इथियोपियन विमान कंपनी - आफ्रिकन विमान कंपनी संघ - ३ ऑगस्ट २०११[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश मजकूर). १५ मे २०१२. १५ मे २०१२ रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 3. ^ "इथियोपियन विमान कंपनीमधिल नफा- विमानचालन केंद्र" (इंग्लिश मजकूर). ८ ऑक्टोबर २०१२. २9 डिसेंबर २०१२ रोजी पाहिले. 
 4. ^ "इथियोपियन विमान कंपनी प्रतिष्ठीत आफ्रिकन जहाजी माल हवाई कंपनी पुरस्कार" (इंग्लिश मजकूर). सूडान ट्रिब्युन. १ मार्च २०११. १० मे २०१२ रोजी पाहिले. 
 5. ^ "इथियोपियन विमान कंपनी पूर्ण ४० % नफा" (इंग्लिश मजकूर). इथियोपियन पुनरावलोकन. १२ ऑगस्ट २०१२. ४ जानेवरी २०१३ रोजी पाहिले. 
 6. ^ मिउला ,मलेंगा (१६ फेब्रुवरी २०१४) (२३ फेब्रुवरी २०१४). "मालाविया विमान कंपनी प्राप्त केली दूसरे विमान" (इंग्लिश मजकूर). ऑलआफ्रिका.कॉम .मलावी बातम्या एजन्सी. ४ जानेवरी २०१३ रोजी पाहिले. 
 7. ^ "कंपनी प्रोफाइल" (इंग्लिश मजकूर). इथियोपियन विमान कंपनी.BBC बातम्या. २६ सेप्टेंबर २०१४ रोजी पाहिले. 
 8. ^ "प्रोफाइल : इथियोपियन विमान कंपनी" (इंग्लिश मजकूर). BBC बातम्या. २५ जानेवरी २०१०. २६ एप्रिल २०१२ रोजी पाहिले. 
 9. ^ "इथियोपियन CEO टूर आणि विमान कंपनी ७८७ ड्रीमलाइनर पुढच्या प्रस्तुतीसाठी" (इंग्लिश मजकूर). विमानचालन केंद्र. १८ एप्रिल २०१२ रोजी पाहिले. 
 10. ^ "क्लाउड नाइन" (इंग्लिश मजकूर). इथियोपियन हवाई कंपनी. २५ जून २०१४ रोजी पाहिले. 
 11. ^ "इथियोपियन एरलाइन्स" (इंग्लिश मजकूर). क्लियर ट्रिप डॉट कॉम. 
 12. ^ "इथियोपियन - विश्राम कक्ष" (इंग्लिश मजकूर). इथियोपियन हवाई कंपनी. २ मै २०१२ रोजी पाहिले. 


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: