केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BLR, आप्रविको: VOBG) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. २३ मे २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ बंगळूर शहरापासून ३० किमी अंतरावर देवनहळ्ळी ह्या गावामध्ये स्थित आहे.
केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: BLR – आप्रविको: VOBL
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | बंगलोर इंटरनॅशनल एरपोर्ट लिमिटेड (BIAL) | ||
कोण्या शहरास सेवा | बंगळूरू | ||
स्थळ | देवेनहळ्ळी | ||
हब |
| ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३,००२ फू / ९१५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 13°11′56″N 77°42′20″E / 13.19889°N 77.70556°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०९/२७ | १५,१२६ | ४,२०० | डांबरी |
हा विमानतळ सुरू होण्यापूर्वी बंगळूरमधील हवाई वाहतूक एच.ए.एल बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विमानतळ सांभाळत असे. परंतु बंगळूरमधील वाढती वाहतूक हाताळण्यास तो अपूरा पडू लागला. ह्या कारणास्तव देवनहल्ळी येथे २००५ साली नव्या विमानतळाचे बांधकाम सुरू झाले. मार्च २००८ मध्ये कार्यरत होण्याची अपेक्षा असताना काही विलंबांमुळे अखेर मे मध्ये येथून वाहतूक सुरू करण्यात आली. २०१२ साली १२.७ दशलक्ष प्रवासी वाहतूक सांभाळणारा बंगळूरू आंतरराष्ट्रीय हा एका सर्वेक्षणानुसार भारतामधील सर्वोत्तम विमानतळ होता.
एक मोठा टर्मिनल व ३६ गेट्स असलेल्या ह्या विमानतळामध्ये हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळी व्यवस्था आहे.