वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या अंदमान आणि निकोबार प्रदेशाच्या पोर्ट ब्लेर शहरातील विमानतळ आहे.[][],यास 'पोर्ट ब्लेर विमानतळ' असेही म्हणतात.(आहसंवि: IXZआप्रविको: VOPB).हा विमानतळ पोर्ट ब्लेर शहराच्या दक्षिणेस आहे व अंदमान व निकोबारमधील एक मुख्य विमानतळ आहे. भारतीय क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांचेनाव विमानतळाला देण्यात आलेले आहे.

वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
पोर्ट ब्लेर विमानतळ
आहसंवि: IXZआप्रविको: VOPB
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा पोर्ट ब्लेर
समुद्रसपाटीपासून उंची १४ फू / ४ मी
गुणक (भौगोलिक) 11°38′28″N 092°43′47″E / 11.64111°N 92.72972°E / 11.64111; 92.72972
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ १०,७९५ ३,२९० डांबरी

दृष्टीक्षेप

संपादन

या विमानतळावर एकच धावपट्टी आहे. ती ३,२९० मी (१०,७९४ फूट) लांबीची आहे. बहुतेक सर्व मोठ्या विमानांसाठी ती उपयोगी आहे. तरीही, तेथे एरबस ए३२० पेक्षा मोठी विमाने उतरत नाहीत असा ताजा अहवाल सुचवितो. इन्स्ट्रुमेन्ट लॅन्डिग सिस्टिम[मराठी शब्द सुचवा] तेथे कमी दृष्यता असेल तर वापरता येते. पण वैमानिकांनी विमान उतरवण्यापूर्वी ती सुरू असल्याची खात्री करून घेण्यास बजावण्यात आले आहे. या धावपट्टीस छेदणारा एक सामान्य वाहतुकीसाठीचा रस्ता आहे.जिब्राल्टर विमानतळासारखीच येथेही विमानोड्डाणापूर्वी रस्त्यावरची वाहतूक बंद करावी लागते.साचा:Dubious

या लहान विमानतळामुळे व मुख्य देशाच्या भूमीपासून दूर पडलेल्या या बेटामुळे तेथे विमानांच्या फेऱ्या फार कमी आहेत, व आहेत त्या महाग आहे्त.साचा:Fact. येथे २ टर्मिनल आहेत व एरोब्रिज नाही. बसेस वापरण्यात येतात. दुसऱ्या विमानासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे.[ संदर्भ हवा ] मे २००८ मध्ये, अतिवृष्टीमुळे विमानतळावर पूरसदृश स्थिती होती.[] त्याने वाहतूक बंद झाली.

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडियन एअरलाइन्स चेन्नई, कोलकाता
जेट एरवेझ चेन्नई[],हैदराबाद[]
जेटलाइट दिल्ली, कोलकाता
किंगफिशर एअरलाइन्स चेन्नई, कोलकाता

संदर्भ

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2011-07-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ एएआयएरोचे संकेतस्थळ[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  3. ^ अतिवृष्टीमुळे पोर्ट ब्लेर विमानतळ पाण्याखाली! हवाई वाहतूक बाधित.
  4. ^ याहूवरील बातमी
  5. ^ याहूवरील बातमी

बाह्य दुवे

संपादन