गुलबर्गा
गुलबर्गा भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे शहर गुलबर्गा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गुलबर्ग्यापासून हैद्राबाद सुमारे २०० कि.मी. तर बंगलोर दक्षिणेस ६२३ कि.मी. अंतरावर आहे.
?गुलबर्गा गुलबरगाह कर्नाटक • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ४५४ मी |
जिल्हा | गुलबर्गा जिल्हा |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 585101 • +त्रुटि: "९१ ८४७२" अयोग्य अंक आहे • केए-३२ |
इतिहास
संपादनगुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून, निजामाच्या [[हैदराबाद] प्रांताचा एक भाग होते. [[इ.स.चे १४ वे शतक|इ.स.च्या १४व्या शतकातील सुलतान अल्लाउद्दीन हसन बहमनशाह[[हसन गंगू बहमनशाह] यांनी मुस्लिम सुलताना यांनी स्थापलेल्या बहामनी सुलतानशाहीची राजधानी म्हणून हे शहर उदयास आले.
धर्म
संपादनगुलबर्गा आणि त्याचा परिसर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र गाणगापूर हे नरसिंह सरस्वतींमुळे प्रसिद्धीस आले. गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि ख्वाजा बंदे नवाझ दर्गा प्रसिद्ध आहे. नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्त्व वाढवतो.
भाषा
संपादनकन्नड भाषेसह गुलबर्गा मध्ये प्रामुख्याने उर्दू, मराठी बोलल्या जातात.
दळणवळण
संपादनगुलबर्गा रेल्वे स्थानक हे मुंबई-हैद्राबाद-मद्रास-बंगलोर मार्गावरील मध्य रेल्वेचे एक महत्त्वाचे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या बहुतांश गाड्या ह्या स्थानकावर थांबतात. गुलबर्गा शहर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी जोडलेले आहे.
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |