गाणगापूर
कर्नाटकातील एक तीर्थक्षेत्र
गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे. अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे.
गाणगापूर भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,४९१ होती.