नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ

नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी: 成田国際空港; IATA: NRT) हा जपानमधील तोक्यो महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक विमानतळ आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला चिबा प्रांतामधील नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक ह्या विमानतळातून होते. जपान एअरलाइन्स, ऑल निप्पॉन एअरलाइन्स आणि निप्पॉन कार्गो एअरलाइन्स या कंपन्याचा आंतरराष्ट्रीय वाहतूकतळ तसेच जेटस्टार जपान, पीच आणि व्हॅनिला एर या कंपन्यांचा मुख्य वाहतूक तळ येथे आहे. या शिवाय डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एअरलाइन्सचा आशियाई वाहतूकतळ नारिता येथे आहे.

नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नियंत्रण कक्ष

प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने नारिता हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तोक्यो शहरामधील दुसरा विमानतळ आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°45′53″N 140°23′11″E / 35.76472°N 140.38639°E / 35.76472; 140.38639