व्हर्जिन अटलांटिक ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी आहे. इंग्लंडच्या दक्षिण भागातील क्रॉली शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीचे मुख्य तळ लंडन हीथ्रो, लंडन गॅटविक आणि मँचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आहेत. येथून व्हर्जिन अटलांटिक जगातील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवते.

व्हर्जिन अटलांटिकची ५१% मालकी व्हर्जिन अटलांटिक लिमिटेड या वेगळ्या कंपनीकडे तर ४९% मालकी डेल्टा एर लाइन्सकडे आहे.

२०१२ साली व्हर्जिन अटलांटिकने ५४ लाख प्रवाशांची ने-आण केली होती.