हीथ्रो विमानतळ
(लंडन हीथ्रो या पानावरून पुनर्निर्देशित)
लंडन हीथ्रो विमानतळ (आहसंवि: LHR, आप्रविको: EGLL) हा युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ लंडन शहराच्या हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित आहे. २०१२ साली ७ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा हीथ्रो विमानतळ युरोपातील पहिल्या तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. २०२३मध्ये हा जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे असलेला विमानतळ आहे.[१]
लंडन हीथ्रो विमानतळ London Heathrow Airport | |||
---|---|---|---|
हीथ्रो विमानतळाचा टर्मिनल ५ | |||
आहसंवि: LHR – आप्रविको: EGLL | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | लंडन | ||
स्थळ | हिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड | ||
हब | ब्रिटिश एरवेझ | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ८३ फू / २५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 51°28′39″N 0°27′41″W / 51.47750°N 0.46139°W | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
09L/27R | 3,901 | डांबरी | |
09R/27L | 3,660 | grooved asphalt | |
सांख्यिकी (२०१२) | |||
एकूण प्रवासी | ▲ ७,००,३७,४१७ |
सध्या एकूण ९० पेक्षा अधिक हवाई वाहतूक कंपन्या हीथ्रो विमानतळ वापरतात व येथून १७० शहरांना सेवा पुरवली जाते. येथे ५ टर्मिनल्स व २ समांतर धावपट्ट्या आहेत.
टर्मिनल
संपादनसप्टेंबर २०२३मध्ये हीथ्रो वर ये-जा करणारी प्रवासी विमाने चार टर्मिनल वापरतात.[२]
टर्मिनल | विमानवाहतूक कंपन्या आणि संघटने |
---|---|
टर्मिनल २ | स्टार अलायन्स, चायना एरलाइन्स आणि लहान पल्ल्याच्या छोट्यामोठ्या कंपन्या |
टर्मिनल ३ | वनवर्ल्ड (इबेरिया, मलेशिया एरलाइन्स, रॉयल एर मारोक आणि कतार एरवेझ सोडून), एरोमेक्सिको, डेल्टा एर लाइन्स, मिडल ईस्ट एरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक आणि लांब पल्ल्याच्या असंघटित कंपन्या |
टर्मिनल ४ | स्कायटीम (एरोमेक्सिको, चायना एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, मिडल ईस्ट एरलाइन्स आणि व्हर्जिन अटलांटिक सोडून), मलेशिया एरलाइन्स, रॉयल एर मारोक, कतार एरवेझ आणि उरलेल्या असंघटित कंपन्या |
टर्मिनल ५ | ब्रिटिश एरवेझ, इबेरिया |
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "London Heathrow Reclaims Title as World's Most Connected Airport". Business Traveler USA (इंग्रजी भाषेत). 2023-09-22. 2023-10-08 रोजी पाहिले.
- ^ "Heathrow destinations and airlines". heathrowairport.com. 8 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 July 2019 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |