कोपनहेगन विमानतळ
कोपनहेगन विमानतळ (डॅनिश: Københavns Lufthavn) (आहसंवि: CPH, आप्रविको: EKCH) हा डेन्मार्क देशाच्या कोपनहेगन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. कोपनहेगन शहराच्या ८ किमी दक्षिणेस व स्वीडनच्या माल्म शहराच्या २४ किमी पश्चिमेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कॅंडिनेव्हिया व उत्तर युरोपामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. ओरेसुंड पूलाद्वारे हा विमानतळ स्वीडन देशासोबत देखील जोडला गेला आहे.
कोपनहेगन विमानतळ Københavns Lufthavn (डॅनिश) | |||
---|---|---|---|
आहसंवि: CPH – आप्रविको: EKCH
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | कोपनहेगन | ||
स्थळ | कोपनहेगन महानगर | ||
हब | सिंबर डॅनिश एर ट्रान्सपोर्ट नॉर्वेजियन एर शटल स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १७ फू / ५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 55°37′5″N 12°39′22″E / 55.61806°N 12.65611°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
04L/22R | ११,८११ | ३,६०० | डांबरी |
04R/22L | १०,८२७ | ३,३०० | डांबरी |
12/30 | ९,१८६ | २,८०० | डांबरी |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | २,५६,२७,०९३ | ||
विमाने | २,५१,७९९ | ||
स्रोत: [१] |
एप्रिल १९२५ मध्ये खुला करण्यात आलेला कोपनहेगन विमानतळ हा जगतील सर्वात जुन्या नागरी विमानतळांपैकी एक आहे. स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा हब येथेच स्थित आहे.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "AIP Denmark. Copenhagen: Trafikstyrelsen/Danish Transport Authority" (PDF). 2012-06-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-03-13 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-06-05 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |