ओरेसुंड पूल
ओरेसुंड पूल हा (डॅनिश: Øresundsbroen, स्वीडिश: Öresundsbron) डेन्मार्क व स्वीडन ह्या देशांदरम्यान ओरेसुंड आखातावर बांधलेला एक बोगदा-पूल आहे. हा पूल डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला स्वीडनमधील माल्मो ह्या शहराशी जोडतो. एकत्रित रस्तेवाहतूक व रेल्वेवाहतूक करणारा ओरेसुंड पूल युरोपातील सर्वात मोठा पूल आहे. ओरेसुंड पुलाचे वैशिठ्य असे की स्वीडनमधून सुरू होणारा हा ७.८५ किमी लांब पूल पेबरहोम नावाच्या एका कृत्रिम बेटावर संपतो व तेथून वाहतूक एका ४ किमी लांब समुद्राखालील भुयारी बोगद्याद्वारे कोपनहेगन शहरापर्यंत नेली जाते.
ओरेसुंड पुलाचे बांधकाम इ.स. १९९५ मध्ये सुरू झाले व १ जुलै २००० रोजी ह्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी एकूण ३० अब्ज डॅनिश क्रोन एवढा खर्च आला.
गॅलरीसंपादन करा
Öresund Bridge Sweden Denmark
Pylonerna, Sveriges högsta konstruktioner.
Öresundsbron från Lernacken.
Från rymden.
Från Pepparholm mot Sverige.
बाह्य दुवेसंपादन करा
गुणक: 55°34′31″N 12°49′37″E / 55.57528°N 12.82694°E
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |