एरोमेक्सिको ही मेक्सिकोमधील प्रमुख विमानकंपनी आहे. याची धारक कंपनी एरोव्हियास दे मेक्सिको, एस.ए. दे सी.व्ही आहे.[] मेक्सिको सिटीमध्ये मुख्यालय असलेली ही विमानकंपनी मेक्सिको, अमेरिका, कॅरिबियन, युरोप आणि आशियातील ५६ गंतव्यस्थानांना विमानसेवा पुरवते.[] एरोमेक्सिकोचा मुख्य तळ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून दुय्यम तळ मॉंतेरे आंतरराष्ट्रीय विमानतळ, ग्वादालाहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हेर्मोसियो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत.

एरोमेक्सिकोच्या विमानांच्या शेपटीवर क्वाह्ट्लीचे (गरुड योद्धा) चित्र असते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Report on Actions of Social Responsibility." Aeroméxico. 41 (43/44). Retrieved on 4 December 2010. "Paseo de la Reforma 445, Col. Cuauhtémoc. C.P. 06500 México D.F."
  2. ^ Meta description text on "Destinos", Aeromexico website