बुखारेस्ट
बुखारेस्ट (रोमेनियन: București; उच्चार ) ही रोमेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर वसलेले बुखारेस्ट रोमेनियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.
बुखारेस्ट Bucureşti |
|||
रोमेनिया देशाची राजधानी | |||
| |||
देश | रोमेनिया | ||
स्थापना वर्ष | इ.स. १४५९ | ||
क्षेत्रफळ | २२८ चौ. किमी (८८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | कमाल २९५ फूट (९० मी) किमान १९७ फूट (६० मी) |
||
लोकसंख्या (१ जुलै २०१०) | |||
- शहर | १९,४२,२५४[१][२][३] | ||
- घनता | ८,५१० /चौ. किमी (२२,००० /चौ. मैल) | ||
- महानगर | २१,९२,३७२ | ||
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.pmb.ro |
१ जुलै २०१० रोजी बुखारेस्ट शहराची लोकसंख्या १९,४२,२५४ इतकी होती.[१] बुखारेस्ट महानगर परिसरात सुमारे २२ लाख लोक राहतात.[२][३] ह्या बाबतीत युरोपियन संघामध्ये बुखरेस्टचा सहावा क्रमांक लागतो. येथील उल्लेखनीय वास्तू व कलेसाठी बुखारेस्टला लहान पॅरिस (Micul Paris) किंवा पूर्वेकडील पॅरिस ह्या टोपणनावांनी ओळखले जाते.[४]
इतिहास
संपादनइ.स. १४५९ साली सर्वप्रथम उल्लेखले गेलेले बुखारेस्ट शहर १७व्या शतकाच्या सुरुवातीस ओस्मानी साम्राज्याने जाळून टाकले होते. त्यानंतर अनेक वेळा ह्या शहराचे नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झाले व पुनर्बांधणी करण्यात आली. १८६२ साली बुखारेस्ट रोमेनियाचे राजधानीचे शहर बनले. जानेवारी १९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीच्या लुफ्तवाफे हवाई दलाने केलेल्या बॉंब हल्ल्यात बरेचसे बुखारेस्ट बेचिराख झाले होते. युद्ध संपल्यानंतर स्थापन झालेल्या कम्युनिस्ट रोमेनियाच्या राजवटीखाली बुखारेस्ट पुन्हा बांधण्यात आले व येथील कला व संस्कृतीचे पुनरुज्जिवन झाले. निकोलाइ चाउसेस्कुने बुखारेस्टमधील अनेक ऐतिहासिक भाग जमीनदोस्त करून तेथे साम्यवादी रचनेच्या इमारती बांधल्या. इ.स. २००० नंतर बुखारेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे व सध्या येथील सुविधा अद्ययावत आहेत.
भूगोल
संपादनबुखारेस्ट शहर रोमेनियाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर २२६ वर्ग किमी क्षेत्रफळावर वसले आहे. बुखारेस्ट परिसरात अनेक नैसर्गिक सरोवरे आहेत.
हवामान
संपादनबुखारेस्टचे हवामान दमट व सौम्य आहे.
बुखारेस्ट साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
विक्रमी कमाल °से (°फॅ) | 16 (61) |
22 (72) |
29 (84) |
32 (90) |
37 (99) |
43 (109) |
41 (106) |
41 (106) |
39 (102) |
35 (95) |
26 (79) |
20 (68) |
43 (109) |
सरासरी कमाल °से (°फॅ) | 1.5 (34.7) |
4.1 (39.4) |
10.5 (50.9) |
18 (64) |
23.3 (73.9) |
26.8 (80.2) |
28.8 (83.8) |
28.5 (83.3) |
24.6 (76.3) |
18 (64) |
10 (50) |
3.8 (38.8) |
16.5 (61.7) |
सरासरी किमान °से (°फॅ) | −5.5 (22.1) |
−3.3 (26.1) |
0.3 (32.5) |
5.6 (42.1) |
10.5 (50.9) |
14 (57) |
15.6 (60.1) |
15 (59) |
11.1 (52) |
5.7 (42.3) |
1.6 (34.9) |
−2.6 (27.3) |
5.7 (42.3) |
विक्रमी किमान °से (°फॅ) | −32 (−26) |
−26 (−15) |
−19 (−2) |
−4 (25) |
0 (32) |
5 (41) |
8 (46) |
7 (45) |
0 (32) |
−6 (21) |
−14 (7) |
−23 (−9) |
−32 (−26) |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 40 (1.57) |
36 (1.42) |
38 (1.5) |
46 (1.81) |
70 (2.76) |
77 (3.03) |
64 (2.52) |
58 (2.28) |
42 (1.65) |
32 (1.26) |
49 (1.93) |
43 (1.69) |
595 (23.43) |
सरासरी पर्जन्य दिवस | 6 | 6 | 6 | 7 | 6 | 6 | 7 | 6 | 5 | 5 | 6 | 6 | 72 |
सरासरी हिमवर्षेचे दिवस | 6 | 3 | 4 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 2 | 4 | 19 |
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) | 87 | 84 | 73 | 63 | 63 | 62 | 58 | 59 | 63 | 73 | 85 | 89 | 72 |
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास | 61 | 85 | 155 | 180 | 248 | 270 | 341 | 310 | 240 | 155 | 60 | 62 | २,१६७ |
स्रोत: World Meteorological Organisation [५] |
शहर रचना
संपादनलोकसांख्यिकी
संपादनकला
संपादनक्रीडा
संपादनफुटबॉल हा बुखारेस्टमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. रोमेनियामधील दोन सर्वात यशस्वी व लोकप्रिय क्ल्ब एफ.सी. स्तेआवा बुकुरेस्त व एफ.सी. दिनामो बुकुरेस्त हे बुखारेस्टमध्येच आहेत. रोमेनियाचे राष्ट्रीय स्टेडियम अरेना नात्सियोनाला बुखारेस्टमध्ये असून २०१२ मधील युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना येथेच खेळवला गेला होता. युएफा यूरो २०२० स्पर्धेतील १३ यजमान शहरांपैकी बुखारेस्ट एक असून येथे साखळी फेरीचे ३ व बाद फेरीचा एक सामना खेळवला जाईल.
वाहतूक
संपादनविमान
संपादनबुखारेस्टमध्ये दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या उत्तरेस १६ किमी अंतरावर आहे. ओटोपेनी या गावाजवळ असलेला हा विमानतळ रोमेनियातील सगळ्यात व्यस्त विमानतळ असून २०१३मध्ये येथून ७६,४३,४६७ प्रवाशांनी येजा केली. ऑरेल व्लैचू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा शहराच्या मध्यवर्ती भागापासून ८ किमी अंतरावर असलेला छोटा विमानतळ आहे.
अर्थकारण
संपादनजुळी शहरे
संपादनखालील शहरांचे बुखारेस्टसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
टीपा
संपादन- ^ a b "Largest Romanian cities in 2010" (Romanian भाषेत). August 28, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b "Demographia World Urban Areas & Population Projections" (PDF). 2011-04-14 रोजी पाहिले.
- ^ a b (इंग्रजी) XIX Meeting of METREX Network, Nürnberg, 15–18 June 2005. ""Bucharest: Few expectations for urban development", page 29" (PDF). 2008-02-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2007-03-07 रोजी पाहिले.
- ^ Bucharest, the small Paris of the East
- ^ "World Weather Information Service – Bucharest". July 2011. 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-14 रोजी पाहिले.
- ^ "Twinning Cities: International Relations" (PDF). Municipality of Tirana. www.tirana.gov.al. 2011-10-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-06-23 रोजी पाहिले.
- ^ Wikisource.org (पोर्तुगीज)
- ^ "International Relations – São Paulo City Hall – Official Sister Cities". Prefeitura.sp.gov.br. 2011-04-14 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h "Academy of Economic Studies – Short History of Bucharest". Ase.edu.ro. 2008-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-31 रोजी पाहिले.
- ^ "Sister Cities". Beijing Municipal Government. 2011-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-23 रोजी पाहिले.
- ^ "Sister Cities of Manila". © 2008–2009 City Government of Manila. 2011-04-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-07-02 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य) - ^ Istanbul Metropolitan Municipality: Cities which signed Sistership, Cooperation and Goodwill treaties with Istanbul
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ
- बुखारेस्ट नकाशा Archived 2010-07-08 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील बुखारेस्ट पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |