एफ.सी. स्तेआवा बुकुरेस्त
एफ.सी. स्तेआवा बुकुरेस्त (रोमेनियन: Fotbal Club Steaua București) हा रोमेनियाच्या बुखारेस्ट शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९४७ सालापासून अस्तित्वात असलेला स्तेआवा रोमेनियामधील सर्वात यशस्वी क्लब मानला जातो. स्तीआवाने आजवर लीगा १ ही रोमेनियामधील सर्वोच्च श्रेणीची लीग स्पर्धा २६ वेळा जिंकली असून त्यांनी १९८६ च्या हंगामामध्ये युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते.
एफ.सी. स्तेआवा बुकुरेस्त | |||
पूर्ण नाव | Football Club Steaua București | ||
---|---|---|---|
टोपणनाव | Roș-Albaștrii (लाल आणि निळे) | ||
स्थापना | ७ जून १९४७ | ||
मैदान | अरेना नात्सियोनाला बुखारेस्ट, रोमेनिया (आसनक्षमता: ५५,६३४) | ||
लीग | लीगा १ | ||
२०१५-१६ | दुसरा | ||
|
बुखारेस्टमधील दुसरा लोकप्रिय क्लब एफ.सी. दिनामो बुकुरेस्त सोबत स्तेआवाची अनेक दशकांची प्रतिस्पर्धा आहे.