सायप्रस
सायप्रसचे प्रजासत्ताक (ग्रीक: Κυπριακή Δημοκρατία; तुर्की: Kıbrıs Cumhuriyeti) दक्षिण युरोपामधील एक हा द्वीप-देश आहे. सायप्रस भूमध्य समुद्रात ग्रीसच्या पूर्वेला, तुर्कस्तानच्या दक्षिणेला, सिरिया व लेबेनॉनच्या पश्चिमेला व इस्रायलच्या वायव्येला एका बेटावर वसला आहे. सायप्रसला युरोप व आशिया ह्या दोन्ही खंडांत गणले जाते. सायप्रस १ मे २००४ पासून युरोपियन संघाचा सदस्य आहे. निकोसिया ही सायप्रसची राजधानी आहे.
सायप्रस Κύπρος (ग्रीक) Kıbrıs (तुर्की) सायप्रसचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: Ὕμνος εἰς τὴν Ἐλευθερίαν स्वातंत्र्याचे गाणे | |||||
सायप्रसचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
निकोसिया | ||||
अधिकृत भाषा | ग्रीक, तुर्की | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | निकोस अनास्तासियादेस | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १६ ऑगस्ट १९६० (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
युरोपीय संघात प्रवेश | १ मे २००४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ९,२५१ किमी२ (१६८वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १०,९९,३४१ (१५९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ११७/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २३.७२८ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २९,०७४ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८४० (अति उच्च) (३१ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | यूरो | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | CY | ||||
आंतरजाल प्रत्यय | .cy | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३५७ | ||||
प्रागैतिहासिक काळापासून मानवी वास्तव्य असलेल्या सायप्रस बेटावर इ.स.पूर्व ३३३ मध्ये अलेक्झांडर द ग्रेटने ताबा मिळवला. त्यानंतरच्या काळात येथे इजिप्त, रोमन साम्राज्य, बायझेंटाईन साम्राज्य, व्हेनिस इत्यादी साम्राज्यांची सत्ता राहिली. १५७१ साली ओस्मानी साम्राज्याने सायप्रसवर विजय मिळवला व त्यानंतर ३ दशके हा भाग ओस्मानांकडे होता. १८७८ साली सायप्रसला ब्रिटनच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आले. १९६० साली सायप्रसला स्वातंत्र्य मिळाले व १९६१ मध्ये सायप्रस राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य बनला.
सायप्रसच्या दक्षिणेकडील भागात ग्री़क लोकांचे तर उत्तरेकडील भागात तुर्की लोकांचे वर्चस्व आहे. १९८३ सालापासुन उत्तर सायप्रस हा स्वतंत्र एक देश असल्याचा दावा ह्या भागातील लोकांनी केला आहे. उत्तर सायप्रस ह्या देशाला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. सायप्रस बेटावरील सुमारे ३७% भाग उत्तर सायप्रसच्या अखत्यारीत येतो.
सायप्रसची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटन उद्योगावर अवलंबुन आहे. येथील दरडोई उत्पन्न उच्च आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (मराठी मजकूर)