इस्तंबूल अतातुर्क विमानतळ

इस्तंबूल अतातुर्क विमानतळ (तुर्की: İstanbul Atatürk Havalimanı) (आहसंवि: ISTआप्रविको: LTBA) हा तुर्कस्तान देशामधील सर्वात मोठा व इस्तंबूल शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ इस्तंबूलच्या पश्चिम भागात स्थित आहे. १९२४ सालापासून वापरात असलेल्या ह्या विमानतळाला १९८० साली तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क ह्याचे नाव देण्यात आले. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एअरलाइन्सचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

इस्तंबूल अतातुर्क विमानतळ
İstanbul Atatürk Havalimanı
Ataturk Airport Karakas-1.jpg
आहसंवि: ISTआप्रविको: LTBA
IST is located in तुर्कस्तान
IST
IST
तुर्कस्तानमधील स्थान
माहिती
मालक तुर्कस्तान सरकार
कोण्या शहरास सेवा इस्तंबूल
हब तुर्की एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १६३ फू / ५० मी
गुणक (भौगोलिक) 40°58′34″N 28°48′51″E / 40.97611°N 28.81417°E / 40.97611; 28.81417गुणक: 40°58′34″N 28°48′51″E / 40.97611°N 28.81417°E / 40.97611; 28.81417
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
17L/35R 3,000 9,843 कॉंक्रीट
17R/35L 3,000 9,843 कॉंक्रीट
05/23 2,580 8,465 डांबरी
सांख्यिकी (2014)
एकूण प्रवासी 56,954,790
आंतरराष्ट्रीय प्रवासी 38,200,788
येथे थांबलेले एतिहाद एअरवेजचे एअरबस ए३२१ विमान

२०१३ साली ५.१ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा अतातुर्क विमानतळ युरोपातील पाचव्या तर जगातील १७व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते. सध्या तुर्की एअरलाइन्स येथून भारतामधील दिल्लीमुंबई ह्या शहरांना प्रवासीसेवा पुरवते.

बाह्य दुवेसंपादन करा