माद्रिद–बाराहास विमानतळ

(आदोल्फो सुआरेझ माद्रिद-बराहास विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Adolfo Suárez Madrid-Barajas) (आहसंवि: MADआप्रविको: LEMD) हा स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२८ साली उघडलेला व माद्रिदपासून केवळ ९ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील सर्वात वर्दळीचा तर युरोपमध्ये सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ
Aeropuerto Adolfo Suárez Madrid-Barajas (स्पॅनिश)
आहसंवि: MADआप्रविको: LEMD
MAD is located in स्पेन
MAD
MAD
स्पेनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक विन्ची समूह
कोण्या शहरास सेवा माद्रिद, माद्रिद संघ
हब आयबेरिया
एर युरोपा
एर नॉस्ट्रम
समुद्रसपाटीपासून उंची २००० फू / ६१० मी
गुणक (भौगोलिक) 40°28′20″N 3°33′39″W / 40.47222°N 3.56083°W / 40.47222; -3.56083
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
14R/32L 13,451 4,100 डांबरी
18L/36R 11,482 3,500 डांबरी
14L/32R 11,482 3,500 डांबरी
18R/36L 14,268 4,349 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ४,१८,३३,३७४
मालवाहतूक ३,६६,६४५ टन
विमाने ३,४२,६०१
स्रोत: प्रवासी वाहतूक, AENA[]
येथून निघालेले एर फ्रान्सचे एरबस ए३२० विमान

२०१४ साली माद्रिद विमानतळाला स्पेनचा दिवंगत पंतप्रधान अदोल्फो सुआरेझ ह्याचे नाव देण्यात आले. हा विमानतळ माद्रिद मेट्रो ह्या जलद परिवहन प्रणालीने माद्रिद शहरासोबत जोडला गेला आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "AENA passenger statistics and aircraft movements". Aena.es.

बाह्य दुवे

संपादन