हानेडा विमानतळ
टोकियो, जपान येथील विमानतळ
(हानेदा विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HND, आप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या तोक्यो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ तोक्यो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत तोक्योचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे.
तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ 東京国際空港 | |||
---|---|---|---|
आहसंवि: HND – आप्रविको: RJTT
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | ओटा, तोक्यो | ||
हब | जपान एअरलाइन्स ऑल निप्पॉन एअरवेज | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २१ फू / ६ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 35°33′12″N 139°46′52″E / 35.55333°N 139.78111°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
16R/34L | 9,843 | 3,000 | डांबरी काँक्रीट |
16L/34R | 11,024 | 3,360 | डांबरी काँक्रीट |
04/22 | 8,202 | 2,500 | डांबरी काँक्रीट |
05/23 | 8,202 | 2,500 | डांबरी काँक्रीट |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | ७,२८,२६,८६२ | ||
स्रोत: Japanese Aeronautical Information Publication at Aeronautical Information Service[१] |
२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ व लंडन-हीथ्रो ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत