कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ
(कन्साइ आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी भाषा: 関西国際空港) (आहसंवि: KIX, आप्रविको: RJBB) हा जपान देशाच्या ओसाका शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओसाका शहराच्या ३४ किमी नैऋत्येस ओसाकाच्या उपसमुद्रामधील एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला हा विमानतळ ओसाका शहर तसेच ओसाका प्रभागातील इतर अनेक शहरांसाठी प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवतो. १९९४ सालापासून कार्यरत असलेला कन्साई विमानतळ आजच्या घडीला तोक्यो शहरामधील हानेडा विमानतळ व नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांच्याखालोखाल जपानमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ 関西国際空港 | |||
---|---|---|---|
कृत्रीम बेटावर बांधण्यात आलेला कन्साई विमानतळ | |||
आहसंवि: KIX – आप्रविको: RJBB
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | ओसाका | ||
स्थळ | ओसाका महानगर | ||
हब | ऑल निप्पॉन एरवेझ फेडेक्स एक्सप्रेस जपान एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १७ फू / ५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 34°26′3″N 135°13′58″E / 34.43417°N 135.23278°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
06R/24L | ११,४८३ | ३,५०० | डांबरी |
06L/24R | १३,१२३ | ४,००० | डांबरी |
सांख्यिकी (२०१७) | |||
प्रवासी | २,७९,८७,५६४ | ||
विमाने | १,८५,१७४ |
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |