जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ
जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ (आहसंवि: IAH, आप्रविको: KIAH, एफ.ए.ए. स्थळसूचक: IAH) हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ George Bush Intercontinental Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: IAH – आप्रविको: KIAH | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | ह्युस्टन महानगरपालिका | ||
प्रचालक | ह्युस्टन विमानतळ प्रणाली | ||
कोण्या शहरास सेवा | ह्यूस्टन | ||
स्थळ | ह्यूस्टन | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ९७ फू / ३० मी | ||
गुणक (भौगोलिक) | 29°59′04″N 095°20′29″W / 29.98444°N 95.34139°W | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१५एल/३३आर | १२,००१ | ३,६५८ | सिमेंट |
15आर/३३एल | ९,९९९ | ३,०४८ | सिमेंट |
९/२७ | १०,००० | ३,०४८ | सिमेंट |
८एल/२६आर | ९,००० | २,७४३ | सिमेंट |
८आर/२६एल | ९,४०२ | २,८६६ | सिमेंट |
ह्युस्टन शहराच्या उत्तरेस २० मैल (३२ किमी)[१][२] असलेला हा विमानतळ ह्युस्टन खेरीज शुगरलॅंड-बेटाउन उपनगरांनाही सेवा पुरवतो. १०,००० एकर (४० किमी²)वर पसरलेला हा विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग टेक्सासमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. याला अमेरिकेच्या ४१व्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशचे नाव देण्यात आलेले आहे.
या विमानतळावरून २०११ साली ४,०१,८७,४४२ प्रवाशांनी ये-जा केली.[३] त्यानुसार हा उत्तर अमेरिकेतील १०व्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ होता. येथे युनायटेड एरलाइन्सचे सगळ्यात मोठे ठाणे असून या विमानकंपनीने येथून १ कोटी ६६ लाख प्रवासी नेले.[४] या विमानतळावर स्पिरिट एरलाइन्सचेही ठाणे आहे.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
संपादनप्रवासी
संपादनप्रस्तावित गंतव्यस्थाने
संपादन- भारतातील एका शहरातून थेट विमानसेवा करण्याचे बेत एर इंडिया आणि ह्युस्टन विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेले आहेत.[९]
- चायना एरलाइन्स ने तैपै आणि ह्युस्टन दरम्यान विमानसेवा सुरू करण्याचा बेत केला आहे. एव्हा एरच्या विमानसेवेतील मालवाहतूकीतील वाढ पाहून चायना एरलाइन्स एरबस ए-३५०ृ९०० प्रकारचे विमान वापरून ही सेवा सुरू करण्याचा विचार करीत आहे.
- इथियोपियन एरलाइन्स अदिस अबाबापासून ह्युस्टन किंवा शिकागोला विमानसेवा सुरू करण्यास बघत आहे. इथियोपियन आपल्या येऊ घातलेली बोईंग ७८७ किंवा एरबस ए३५० प्रकारची विमाने वापरून अंदाजे २०१७पासू ही सेवा पुरवेल.[१०]
- खनिज तेल उद्योगातील कामगार, अधिकारी व व्यापाऱ्यांसाठी टाग ॲंगोला एरलाइन्स लुआंडा ते ह्युस्टन थेट सेवा सुरू करेल.[११]
- अमेरिका आणि क्युबातील व्यापारसंबंध सुधारल्यावर युनायटेड एरलाइन्सला ह्युस्टन आणि हबाना तसेच न्यूअर्क आणि हबाना दरम्यान विमानसेवा सुरू करायची आहे.[१२]
पूर्वी उपलब्ध असलेली विमानसेवा
संपादनया विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी येथून अमेरिकन एरलाइन्स, ब्रॅनिफ इंटरनॅशनल एरवेझ, कॉन्टिनेन्टल एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स, ईस्टर्न एरलाइन्स, नॅशनल एरलाइन्स आणि टेक्सास इंटरनॅशनल एरलाइन्स या विमानकंपन्या सेवा पुरवायच्या.[१३] यांशिवाय पॅन ॲमची मेक्सिको सिटीला बोईंग ७०७ वापरून आठवड्यातून दहा उड्डाणे, केएलएमची मॉंत्रिआलमार्गे ॲम्स्टरडॅमला डग्लस डीसी-८ वापरून आठवड्यातून चार वेळा, ब्रॅनिफची बोईंग ७२७ वापरून पनामा सिटी आणि एरोनेव्हस दि मेहिको (आताची एरोमेक्सिको) या कंपनीची डग्लस डीसी-९ वापूरन मॉंतेरे, ग्वादालाहारा, पोर्तो व्हायार्ता, अकापुल्को आणि मेक्सिको सिटीला आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध होती.[१४][१५][१६][१७]
याशिवाय टेक्सास इंटरनॅशनलची डीसी-९ विमाने मॉंतेरे तर कॉन्व्हेर ६०० प्रकारची विमाने टॅम्पिको आणि व्हेराक्रुझला सेवा पुरवायची.[१८] १९७१मध्ये केएलएमने बोईंग ७४७विमाने येथे आणण्यास सुरुवात केली. १९७४मध्ये एरफ्रांसची ७४७ विमाने पॅरिस-ह्युस्टन-मेक्सिको सिटी अशी आठवड्यातून चार फेऱ्या करायची.[१९] याच सुमारास कॉन्टिनेन्टल आणि नॅशनलने मॅकडोनेल डग्लस डीसी-१० प्रकारची तर डेल्टाने लॉकहीड एल-१०११ विमाने देशांतर्गत प्रवासासाठी वापरण्यास सुरुवात केली.[२०] १९७० च्या दशकाच्या शेवटास केमन एरवेझने येथून ग्रँड केमन आणि कॅरिबियन समुद्रातील इतर शहरास बीएसी १-११ विमाने वापरून उड्डाणे सुरू केली.[२१] केमन एरवेझने नंतर बोईंग ७२७-२००, ७३७-२००, -३००, -४०० आणि डीसी-८ प्रकारची विमानेही वापरली.[२२]
जुलै १९८३ च्या सुमारास येथून अमेरिकन, कॉन्टिनेन्टल, डेल्टा आणि ईस्टर्न व्यतिरिक्त पीडमॉंट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स, टीडब्ल्ययूए, युनायटेड एरलाइन्स, युएसएर आणि वेस्टर्न एरलाइन्स या कंपन्यांची सेवाही उपलब्ध झाली होती.[२३] वेस्टर्न एरलाइन्स मॅकडोनेल डग्लस डीसी-१० प्रकारच्या विमानाने सॉल्ट लेक सिटी व तेथून ॲंकोरेजला सेवा परवीत असे[२४] नवीन आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये एर कॅनडा, एव्हियाटेका, ब्रिटिश कॅलिडोनियन एरवेझ, कॉन्टिनेन्टल एरलाइन्स, ईस्टर्न एरलाइन्स, साहसा, साउथ आफ्रिकन एरवेझ, टाका एरलाइन्स आणि व्हियासा तसेच पॅन ॲम, केएलएम, एर फ्रांस, एरोमेक्सिको आणि केमन एरवेझचा समावेश होता.[२५] याशिवाय एमेराल्ड एर (पॅन ॲम एक्स्प्रेस नावाने), मेट्रो एरलाइन्स, रियो एरवेझ आणि रॉयल एरलाइन्स येथून प्रादेशिक सेवा पुरवीत.[२३] मेट्रो एरलाइन्स डि हॅविललॅंड कॅनडा डीएएचसी-६ ट्विन ऑटर प्रकारच्या विमानाद्वारे ह्युस्टन शहरांतर्गत सेवा पुरवी. ही उड्डाणे आंतरखंडीय विमानतळ आणि शुगरलॅंड प्रादेशिक विमानतळादरम्यान ९ तसेच आंतरखंडीय विमानतळ आणि नासा जॉन्सन अंतराळ केन्द्राजवळील छोट्या विमानतळास १७ फेऱ्यांद्वारे होत. याशिवाय मेट्रोची विमाने टेक्सासमधील इतर शहरे आणि लुईझियानादरम्यान सेवा पुरवी.[२३] या विमानतळावरून बेल २०६एल लॉंग रेंजर प्रकारची हेलिकॉप्टरे ह्युस्टन शहरातील चार हेलिपॅडला सेवा पुरवीत.[२३]
ह्युस्टन विमातळावरून पूर्वी एव्हियाक्सा,[२६] अमेरिका वेस्ट एरलाइन्स,[२७] अटलांटिक साउथवेस्ट एरलाइन्स, कॅनेडियन एरलाइन्स, चायना एरलाइन्स, कॉमएर, ग्रुपो टाका, मार्टिनएर, नॉर्थवेस्ट एरलाइन्स, पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्स, प्रिव्हेटेर[२८], रॉयल जॉर्डेनियन आणि वर्ल्ड एरलाइन्स या कंपन्यांची सेवा उपलब्ध होती.
इतर सेवा
संपादनॲटलास एर ह्युस्टन ते ॲंगोलातील लुआंडा शहरास आठवड्यातून तीन वेळा उड्डाण करते. बोईंग ७४७-४०० प्रकारच्या विमानाची ही उड्डाणे सॉनएरसाठी केलील जातात. पूर्वी ही सेवा वर्ल्ड एरवेझ आपली मॅकडोनेल डग्लस एमडी-११ प्रकारची विमानांद्वारे पुरवायची.[२९]
एव्हा एर डॅलस-फोर्ट वर्थ महानगरातून ह्युस्टन विमानतळापर्यंत आरामदायी बससेवा पुरवते. यातील प्रवासी एव्हा एरच्या तैपै फ्लाइटमधून येतात-जातात.[३०] युनायटेड एरलाइन्सने आपली बोमॉंटची उड्डाणे रद्द केली असन त्याऐवजी आता दिवसातून तीन वेळा बसद्वारे प्रवाशांची ने-आण करते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ "About the Airport". Continental Airlines. 2009-07-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-02-09 रोजी पाहिले.
- ^ Downtown to IAH. Google Maps. Last accessed April 21, 2008.
- ^ "Calendar Year 2011 Traffic Summary". फ्लायटूह्युस्टन.कॉम. March 2, 2012. pp. 1, 4. Unknown parameter
|contribution-दुवा=
ignored (सहाय्य); Missing or empty|url=
(सहाय्य);|contribution=
ignored (सहाय्य) - ^ "Airport Fact Sheets, Houston George Bush Intercontinental Airport". युनायटेड.कॉम. December 1, 2013. 2014-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 1, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Air Canada Unveils Major Expansion to 12 U.S. Destinations". November 19, 2015. 2015-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 19, 2015 रोजी पाहिले.
- ^ a b http://www.usatoday.com/story/travel/flights/todayinthesky/2016/01/07/frontier-airlines-new-routes/78402734/
- ^ "संग्रहित प्रत". 2016-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-14 रोजी पाहिले.
- ^ https://www.vacationexpress.com/Res/STWMain.aspx?SessID=A:CA8A80A2-F56C-421B-8D40-914DE631FAE3&Theme=VACEXPRESS
- ^ "Air India seeks pre clearance to US".
- ^ "Ethiopian Airlines plans to expand flights to U.S." 21 October 2015. 14 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "TAAG Angola to take heavy cuts as oil slump hits home". 30 November 2015.
- ^ "United Airlines announces flights to Havana as companies prepare to cash in on Cuba detente". २०१५-११-२२ रोजी पाहिले.
- ^ June 1, 1969 Official Airline Guide (OAG), Houston flight schedules
- ^ "Pan American World Airways system timetables". June 1, 1969. August 24, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Braniff International Airways system timetables". March 15, 1969. August 24, 2015 रोजी पाहिले.
- ^ "KLM Royal Dutch Airlines system timetable". June 15, 1969. August 24, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Aeronaves de Mexico system timetable". June 1, 1969. August 24, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Texas International Airlines system timetable". July 1, 1970. August 24, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Air France system timetable". April 1, 1974. August 24, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Official Airline Guide (OAG), Houston (IAH) flight schedules". April 1, 1974. August 25, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Cayman Airways system timetable". December 15, 1979. August 24, 2015 रोजी पाहिले.
- ^ http://www.departed flights.com, Official Airline Guide (OAG) editions, Houston (IAH) flight schedules
- ^ a b c d "Official Airline Guide (OAG), Houston (IAH) flight schedules". July 1, 1983. August 25, 2015 रोजी पाहिले.
- ^ http://www.departedflights.com, July 1, 1983 Official Airline Guide (OAG)
- ^ "International Official Airline Guide (OAG), Houston (IAH) flight schedules". July 1, 1983. August 25, 2015 रोजी पाहिले.
- ^ http://www.encyclopedia.com/doc/1G2-2690100022.html
- ^ "संग्रहित प्रत". 2016-02-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-14 रोजी पाहिले.
- ^ http://www.chron.com/news/article/The-World-in-Houston-Quarantine-facility-1474757.php
- ^ "Atlas Air Starts the "Houston Express"". Seattle Post-Intelligencer. June 2, 2010. 2010-06-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 2, 2010 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2015-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-02-14 रोजी पाहिले.