दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ

दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (रशियन: Московский аэропорт Домоде́дово) (आहसंवि: DMEआप्रविको: UUDD) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी दोमोदेदोवो हा सर्वात मोठा विमानतळ आहे. शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळव्नुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर दोन विमानतळ देखील मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्को शहराच्या ४२ किमी आग्नेयेस स्थित असलेला दोमोदेदोवो विमानतळ १९६४ साली बांधला गेला. रशियामधील अनेक लहान विमान कंपन्यांचे हब येथेच आहेत. दोमोदेदोवोमध्ये २ धावपट्ट्या व १ टर्मिनल असून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना येथून थेट विमानसेवा पुरवली जाते.

दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Московский аэропорт Домоде́дово (रशियन)
आहसंवि: DMEआप्रविको: UUDD
DME is located in रशिया
DME
DME
रशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा मॉस्को
स्थळ दोमोदेदोवो, मॉस्को ओब्लास्त
हब रूसलाइन
एस७ एअरलाइन्स
ट्रान्सएरो एअरलाइन्स
उरल एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ५८८ फू / १७९ मी
गुणक (भौगोलिक) 55°24′31″N 37°54′22″E / 55.40861°N 37.90611°E / 55.40861; 37.90611
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
14L/32R १२,४६७ ३,८०० डांबरी
14R/32L ११,६४७ ३,५५० डांबरी
सांख्यिकी (२०१३)
प्रवासी ३,०७,६०,०००
विमाने २,५३,५००
स्रोत: बातमी[]
येथे थांबलेले अझरबैजान एरलाइन्सचे बोईंग ७५७ विमान

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन