मॅकडॉनेल-डग्लस एमडी-११

(मॅकडोनेल डग्लस एमडी-११ या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅकडॉनल डग्लस एमडी-११ हे अमेरिकन बनावटीचे लांब पल्ल्याचे तीन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.

सुरुवातीस मॅकडोनेल-डग्लस व नंतर बोईंगने बनवलेल्या या विमानाची रचना डग्लस डीसी-१० या विमानावर आधारित होती. या विमानाची लांबी डीसी-१० पेक्षा जास्त असून त्याच्या पंखांचा आकार मोठा होता तसेच त्यांवर पंखुड्या (विंगलेट्स) लावलेल्या होत्या. इतर बदलांत छोटे शेपूट, सुधारित एरफॉइल[मराठी शब्द सुचवा]तसेच मिश्र धातूंचा वाढीव उपयोग, इ.चा समावेश होता. यात असलेल्या ग्लास कॉकपिटमराठी शब्द सुचवामुळे हे विमान चालविण्यासाठी तीन ऐवजी दोनच वैमानिकांची गरज असायची.