मॅकघी टायसन विमानतळ
मॅकघी टायसन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TYS, आप्रविको: KTYS, एफ.ए.ए. स्थळसूचक: TYS) अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील नॉक्सव्हिल शहराचा विमानतळ आहे. याला पहिल्या महायुद्धात अमेरिकेकडून लढलेल्या चार्ल्स मॅकघी टायसन या वैमानिकाचे नाव देण्यात आलेले आहे.
येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही.
येथे टेनेसी एर नॅशनल गार्डची १३४वी रिफ्युएलिंग विंग[मराठी शब्द सुचवा] तळ ठोकून आहे.