सान अँटोनियो आंतरराष्ट्रीय विमानतळ

(सान ॲंटोनियो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

सान अँटोनियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SATआप्रविको: KSATएफ.ए.ए. स्थळसूचक: SAT) अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील सान अँटोनियो शहराचा विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिकोतील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.