जॅक्सन होल विमानतळ (आहसंवि: JACआप्रविको: KJACएफ.ए.ए. स्थळसूचक: JAC) अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील जॅक्सन होल शहरात असलेला विमानतळ आहे. २०१४मध्ये हा वायोमिंगमधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ होता. त्या वर्षी ३,१३,००० प्रवाशांनी याचा वापर केला. यलोस्टोन नॅशनल पार्कला जाणारे प्रवासी बोझमनसह या विमानतळाचा वापर करतात.

पर्यटनमोसमात येथून १३ ठिकाणी विमानसेवा उपलब्ध असते तर इतर वेळी फक्त डेन्व्हर

आणि सॉल्ट लेक सिटी
येथून विमाने येत जात असतात. येथील बव्हंश प्रवासी युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.