टेड स्टीवन्स अँकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ

टेड स्टीवन्स ॲंकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ANCआप्रविको: PANCएफ.ए.ए. स्थळसूचक: ANC) हा अमेरिकेच्या अलास्का राज्यातील ॲंकरेज शहराचा प्रमुख विमानतळ आहे. उत्तर अमेरिकेतील सगळ्यात उत्तरेस असलेला हा मोठा विमानतळ आंतरराष्ट्रीय मालवाहतूकीचे मोठे केंद्र आहे. येथून युरोप आणि आशियाच्या उत्तर भागातील सगळी शहरे सहज पल्ल्यात आहेत. २०१२मध्ये २२,४९,७१७ प्रवाशांनी येथून ये-जा केली.

या विमानतळाला अलास्काच्या सेनेटर टेड स्टीवन्सचे नाव देण्यात आलेले आहे.