एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ

एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BOGआप्रविको: SKBO) कोलंबियाची राजधानी बोगोता शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून कोलंबियातील बव्हंश विमानतळ तसेच मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळापासून जगातील निवडक मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

येथे आव्हियांका, कोपा एरलाइन्स कोलंबिया, विंगो, विव्हाकोलंबिया, सातेना, ईझीफ्लाय आणि लॅटॅम कोलंबिया या विमानवाहतूक कंपन्यांचे तळ आहेत.