बोगोता ही कोलंबिया देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. बोगोता शहर कोलंबियाच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ८,६६१ फूट उंचीवर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ८६ लाखांपेक्षा अधिक होती. बोगोता हे कोलंबियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.