डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DEN, आप्रविको: KDEN, एफ.ए.ए. स्थळसूचक: DEN) अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात आहे. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. ५३ चौरसमैल क्षेत्रफळ असलेला हा विमानतळ अमेरिकेतील सगळ्यात मोठा तर किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि माँत्रियाल-मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा विमानतळ आहे.[१] येथील १६R/३४L ही धावपट्टी अमेरिकेतील सगळ्यात जास्त लांबीची धावपट्टी आहे.
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ Denver International Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: DEN – आप्रविको: KDEN – एफएए स्थळसंकेत: DEN | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | डेन्व्हर शहर व काउंटी विमानवाहतूक विभाग | ||
कोण्या शहरास सेवा | डेन्व्हर तसेच कॉलोराडो राज्य, पूर्व कॅन्सस, वायोमिंग, ईशान्य नेब्रास्का | ||
स्थळ | डेन्व्हर | ||
हब | |||
समुद्रसपाटीपासून उंची | ५,४३१ फू / १,६५५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 39°51′42″N 104°40′23″W / 39.86167°N 104.67306°Wगुणक: 39°51′42″N 104°40′23″W / 39.86167°N 104.67306°W | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
७/२५ | १२,००० | ३,६५८ | सिमेंट |
८/२६ | १२,००० | ३,६५८ | सिमेंट |
१६एल/३४आर | १२,००० | ३,६५८ | सिमेंट |
१६आर/३४एल | १६,००० | ४,८७७ | सिमेंट |
१७एल/३५आर | १२,००० | ३,६५८ | सिमेंट |
१७आर/३५एल | १२,००० | ३,६५८ | सिमेंट |
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फ्रंटियर एरलाइन्स आणि ग्रेट लेक्स एरलाइन्स या विमानकंपन्यांचे मुख्य तळ आहेत तर हा युनायटेड एरलाइन्सचा चौथ्या क्रमांकाचा तळ आहे. ही विमानतळ साउथवेस्ट एरलाइन्सच्या वाहतूककेन्द्रबिंदूपैकी एक असून येथून साउथवेस्ट एरलाइन्स ४०पेक्षा जास्त शहरांना सेवा पुरवते.
इतिहास
संपादनसप्टेंबर १९८९मध्ये अमेरिकेच्या केन्द्रीय सरकारने डेन्व्हरसाठी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी ६ कोटी अमेरिकन डॉलर मंजूर केले. यासाठी तत्कालीन महापौर फेडरिको पेन्याने मोठे प्रयत्न केले होते. याची जाण म्हणून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला पेन्या बुलेव्हार्ड असे नाव देण्यात आले आहे. या विमानतळाची उद्घाटन तारीख तेव्हाच ऑक्टोबर २९, इ.स. १९९३ ही ठरवण्यात आली.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
संपादनडेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ फ्रंटियर एरलाइन्स आणि ग्रेट लेक्स एरलाइन्सचा सगळ्यात मोठा तर युनायटेड एरलाइन्सचा चौथ्या आणि साउथवेस्ट एरलाइन्सचा पाचव्या क्रमांकाचा मोठा तळ आहे.
या विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांत युनायटेड एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि फ्रंटियर एरलाइन्सचा अनुक्रमे ३७%, २४% आणि २३% वाटा आहे.[२]
मालवाहू विमानकंपन्या
संपादनविमानकंपनी | गंतव्यस्थान |
---|---|
कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एअरलाइन्स | सिनसिनाटी, सॉल्ट लेक सिटी
|
फेडेक्स एक्सप्रेस | बिलिंग्स, फोर्ट वर्थ-मीचम, इंडियानापोलिस, मेम्फिस |
यू.पी.एस. एअरलाइन्स | बिलिंग्स, लुइसव्हिल, ऑन्टारियो, रीनो-टाहो |
लोकप्रिय गंतव्यस्थाने
संपादनक्र. | शहर | प्रवासी | कंपन्या |
---|---|---|---|
१ | लॉस एंजेल्स | ९,५७,००० | अमेरिकन, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड |
२ | फीनिक्स | ९,१६,००० | फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड, यू.एस. एरवेझ |
३ | लास व्हेगस | ८,६६,००० | फ्रंटियर, साउथवेस्ट, स्पिरिट, युनायटेड |
४ | सान फ्रांसिस्को | ८,१०,००० | फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड |
५ | डॅलस/फोर्ट वर्थ | ७,५४,००० | अमेरिकन, फ्रंटियर, स्पिरिट, युनायटेड |
६ | सियॅटल-टॅकोमा | ७,५४,००० | अलास्का, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड |
७ | मिनीयापोलिस-सेंट पॉल | ७,५०,००० | डेल्टा, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड |
८ | अटलांटा | ७,४५,००० | एरट्रान, डेल्टा, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड |
९ | सॉल्ट लेक सिटी | ६,९५,००० | डेल्टा, फ्रंटियर, साउथवेस्ट, युनायटेड |
१० | शिकागो ओ'हेर | ६,६८,००० | अमेरिकन, स्पिरिट, युनायटेड |
क्र. | गंतव्यस्थान | प्रवासी | कंपन्या |
---|---|---|---|
1 | लंडन-हीथ्रो | ३,५६,७९८ | ब्रिटिश एरवेझ |
२ | कॅन्कुन | २,१८,४६९ | फ्रंटियर, युनायटेड |
३ | टोरोंटो-पीयर्सन | २,०६,९५४ | एर कॅनडा, युनायटेड एक्सप्रेस |
४ | कॅलगारी | २,००,३०० | युनायटेड, युनायटेड एक्सप्रेस |
५ | फ्रांकफुर्ट | १,९४,५६६ | लुफ्तांसा |
६ | व्हॅनकूवर | १,५५,०९६ | युनायटेड, युनायटेड एक्सप्रेस |
७ | एडमंटन | १,३०,५६२ | युनायटेड एक्सप्रेस |
8 | विनिपेग | १,०१,१६९ | युनायटेड एक्सप्रेस |
९ | पोर्तो व्हायार्ता | ९४,८६७ | फ्रंटियर, युनायटेड |
१० | मेक्सिको सिटी | ६३,९६६ | एरोमेक्सिको, युनायटेड |
अपघात आणि दुर्घटना
संपादन- सप्टेंबर ५, २००१ - ब्रिटिश एरवेझच्या बोईंग ७७७ प्रकारच्या विमानात इंधन भरले जात असताना त्यास आग लागली. प्रवासी व विमानातील कर्मचारी सुखरूप परंतु इंधन भरणारा कर्मचारी भाजून मृत्युमुखी. एन.टी.एस.बी.च्या अनवेषणानुसार इंधन भरण्याची नळी चुकीच्या कोनात ओढून काढल्यामुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले.[१६]
- फेब्रुवारी १६, २००७ - जवळजवळ चार तास सुरू असलेल्या प्रचंड गारपीटीत १४ विमानांच्या काचा फुटल्या. गारांशिवाय ८० किमी प्रतितास इतक्या वेगाच्या वाऱ्याने जमीनीवरील खडे व इतर वस्तू आदळून काचा फुटल्याचे निष्पन्न.[१७]
- डिसेंबर २०, २००८ - काँटिनेन्टल एरलाइन्स फ्लाइट १४०४ हे बोईंग ७३७-५०० प्रकारचे विमान ह्युस्टनकडे निघालेले विमान धावपट्टी ३४आरवरून डावीकडे भरकटले. यावेळी अंदाजे ६० किमी प्रतितास वेगाचे वारे वाहत होते. एन.टी.एस.बी.च्या अन्वेषणानुसार वैमानिकाकडून विमान उजवीकडे (वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला) दाबून धरण्याचा जोर कमी झाल्याने विमान भरकटले. विमानातील ११५ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी ३८ जखमी. पैकी दोन गंभीर जखमी झाले.[१८][१९][२०]
- एप्रिल ३, २०१२ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ५९१२ हे एक्सप्रेसजेट कंपनीचे ई.आर.जे.-१४५ प्रकारचे पीयोरिया येथून येत असलेले विमान धावपट्टी ३४आर वर उतरत असताना धावपट्टीच्या टोकावर असलेल्या दिव्यांच्या खांबांना धडकले. एक प्रवासी जखमी.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Coventry Airport News: Largest Airport". 2013-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-04 रोजी पाहिले.
- ^ "DIA Business Center: Financials & Statistics: Traffic Statistics". City & County of Denver Department of Aviation (इंग्लिश भाषेत). 2012-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 11, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ http://finance.yahoo.com/news/fly-frontier-between-denver-cleveland-140000919.html;_ylt=A2KJ3CSRRVdQ8HMALYPQtDMD [मृत दुवा]
- ^ "संग्रहित प्रत". 2012-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-11 रोजी पाहिले.
- ^ http://www.wbir.com/rss/article/228711/2/Frontier-Airlines-to-halt-Denver-flights-in-winter-months[permanent dead link]
- ^ http://finance.yahoo.com/news/frontier-announces-nonstop-between-denver-140000586.html [मृत दुवा]
- ^ http://finance.yahoo.com/news/fly-frontier-between-denver-minot-152500450.html;_ylt=A2KJ3CZKOixQSjQAjeHQtDMD [मृत दुवा]
- ^ http://www.deseretnews.com/article/865562403/Frontier-Airlines-to-suspend-Provo-Airport-flights.html
- ^ मॅकमिलन, Molly. "Frontier Airlines to End Flights From Wichita to Denver". The Wichita Eagle. 2012-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 31, 2012 रोजी पाहिले.
- ^ श्रेडर, ॲन. "United Airlines to Begin Direct Denver-to-Tokyo Flight". The Denver Post. May 22, 2012 रोजी पाहिले.
- ^ "United Announces New International And Domestic Routes From Hub Cities" (Press release). July 11, 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ http://www.Laramieboomerang.com/articles/2012/09/17/news/doc50554ff9e0c77976356160.txt[permanent dead link]
- ^ मट्झबॉ, Ben. USA Today http://travel.usatoday.com/flights/post/2012/08/denver-airport-volaris/826521/1?csp=34travel. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ "Denver, CO: Denver International (DEN)". Bureau of Transportation Statistics. September 8, 2012 रोजी पाहिले.
- ^ "U.S. International Air Passenger and Freight Statistics Report". 2010. 2004-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "NTSB Report DEN01FA157[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". National Transportation Safety Board. September 10, 2011 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "NTSB Report DEN07IA069[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". National Transportation Safety Board. June 27, 2007. July 11, 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ Simpson, Kevin; Bunch, Joey; Pankratz, Howard (December 21, 2008). "Continental Jet Veers Off Runway on Takeoff, Slams Into Ravine, Catches Fire". The Denver Post. p. A1. July 11, 2012 रोजी पाहिले.
- ^ "Continental Flight Slides Off Runway; Dozens Injured". KUSA (TV). December 21, 2008. December 21, 2008 रोजी पाहिले.
- ^ "NTSB Begins Investigation Into Why Plane Slid Off Runway". KUSA (TV). December 21, 2008. December 21, 2008 रोजी पाहिले.