हेक्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ

हेक्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: FARआप्रविको: KFARएफ.ए.ए. स्थळसूचक: FAR) अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील फार्गो शहराचा विमानतळ आहे. याला मार्टिन हेक्टरचे नाव दिलेले आहे. हेक्टरने विमानतळासाठीची जागा शहरास दान केली होती.

Hector International Airport - North Dakota.jpg

येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. फार्गो एर नॅशनल गार्ड सुद्धा या विमानतळाचा उपयोग करतात.