नॉर्थ डकोटा
नॉर्थ डकोटा (इंग्लिश: North Dakota) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. नॉर्थ डकोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४८व्या क्रमांकाचे राज्य आहे.
नॉर्थ डकोटा North Dakota | |||||||||
![]() | |||||||||
| |||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||
राजधानी | बिस्मार्क | ||||||||
मोठे शहर | फार्गो | ||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत १९वा क्रमांक | ||||||||
- एकूण | १,८३,२७२ किमी² | ||||||||
- रुंदी | ३४० किमी | ||||||||
- लांबी | ५४५ किमी | ||||||||
- % पाणी | १३.५ | ||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ४८वा क्रमांक | ||||||||
- एकूण | ६,७२,५९१ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||
- लोकसंख्या घनता | ३.५/किमी² (अमेरिकेत ४७वा क्रमांक) | ||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २ नोव्हेंबर १८८९ (३९वा क्रमांक) | ||||||||
संक्षेप | US-ND | ||||||||
संकेतस्थळ | www.nd.gov |
नॉर्थ डकोटाच्या उत्तरेला कॅनडाचे सास्काचेवान व मॅनिटोबा हे प्रांत, पश्चिमेला मोंटाना, पूर्वेला मिनेसोटा तर दक्षिणेला साउथ डकोटा ही राज्ये आहेत. बिस्मार्क ही नॉर्थ डकोटाची राजधानी असून फार्गो हे सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |