माँटाना

(मोंटाना या पानावरून पुनर्निर्देशित)

माँटाना (इंग्लिश: Montana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. माँटाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील चौथे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४४व्या क्रमांकाचे राज्य आहे.

माँटाना
Montana
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: बिग स्काय कंट्री (Big Sky Country)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी हेलेना
मोठे शहर बिलिंग्स
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४वा क्रमांक
 - एकूण ३,८१,१५६ किमी² 
  - रुंदी १,०१५ किमी 
  - लांबी ४१० किमी 
 - % पाणी १३.५
लोकसंख्या  अमेरिकेत ४४वा क्रमांक
 - एकूण ९,८९,४१५ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २.५१/किमी² (अमेरिकेत ४८वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ८ नोव्हेंबर १८८९ (४१वा क्रमांक)
संक्षेप   US-MT
संकेतस्थळ www.mt.gov

माँटानाच्या उत्तरेला कॅनडाचे आल्बर्टासास्काचेवान हे प्रांत, वायव्येला ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पश्चिमेला आयडाहो, पूर्वेला नॉर्थ डकोटासाउथ डकोटा तर दक्षिणेला वायोमिंग ही राज्ये आहेत. हेलेना ही मोंटानाची राजधानी असून बिलिंग्स हे सर्वात मोठे शहर आहे.

इथली स्थानिक वेळ UTCच्या ७ तास मागे असते म्हणजे भारताच्या प्रमाणवेळेपेक्षा साडेबारा तास मागे आहे. हा अमेरिकेतला माउन्टन टाइम आहे. हिवाळ्यात, दिवसाच्या प्रकाशात कामे करता यावीत म्हणून घड्याळे एक तास पुढे करतात.

चित्रदालन

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: