मिनेसोटा

अमेरिकेतील एक राज्य

मिनेसोटा (इंग्लिश: Minnesota) हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिनेसोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २१व्या क्रमांकाचे राज्य आहे.

मिनेसोटा
Minnesota
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: नॉर्थ स्टार स्टेट (North Star State)
ब्रीदवाक्य: L’Étoile du Nord (फ्रेंच: उत्तरेकडील तारा)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी सेंट पॉल
मोठे शहर मिनियापोलिस
क्षेत्रफळ  अमेरिकेत १२वा क्रमांक
 - एकूण २,२५,१८१ किमी² 
  - रुंदी ३२० किमी 
  - लांबी ६४० किमी 
 - % पाणी ८.४
लोकसंख्या  अमेरिकेत २१वा क्रमांक
 - एकूण ५३,०३,९२५ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २५.२/किमी² (अमेरिकेत ३१वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $५५,८०२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ११ मे १८५८ (३२वा क्रमांक)
संक्षेप   US-MN
संकेतस्थळ www.state.mn.us

मिनेसोटाच्या उत्तरेला कॅनडाचे मॅनिटोबाओंटारियो हे प्रांत, पूर्वेला सुपिरियर सरोवरविस्कॉन्सिन, दक्षिणेला आयोवा तर पश्चिमेला नॉर्थ डकोटासाउथ डकोटा ही राज्ये आहेत. सेंट पॉल ही मिनेसोटाची राजधानी असून त्याचे जुळे शहर मिनियापोलिस हे सर्वात मोठे शहर आहे. मिनेसोटामधील ६० टक्के रहिवासी मिनियापोलिस-सेंट पॉल ह्या जुळ्या शहरांमध्ये वास्तव्य करतात. येथे स्कॅंडिनेव्हियनजर्मन वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वसले आहेत.

मिनेसोटा राज्यामध्ये १०,०००हून अधिक सरोवरे आहेत.


गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: