आयोवा (इंग्लिश: Iowa) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले आयोवा हे एक कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती होते. आयोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३०व्या क्रमांकाचे राज्य आहे.

आयोवा
Iowa
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द हॉकाय स्टेट (The Hawkeye State)
ब्रीदवाक्य: Our liberties we prize and our rights we will maintain.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी दे मॉईन
मोठे शहर दे मॉईन
क्षेत्रफळ  अमेरिकेत २६वा क्रमांक
 - एकूण ३,८१,१५६ किमी² 
  - रुंदी ५०० किमी 
  - लांबी ३२० किमी 
 - % पाणी ०.७१
लोकसंख्या  अमेरिकेत ३०वा क्रमांक
 - एकूण ३०,४६,३५५ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २०.७/किमी² (अमेरिकेत ३५वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $४८,०७५
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २८ डिसेंबर १८४६ (२९वा क्रमांक)
संक्षेप   US-IA
संकेतस्थळ www.iowa.gov

आयोवाच्या उत्तरेला मिनेसोटा, वायव्येला साउथ डकोटा, पश्चिमेला नेब्रास्का, दक्षिणेला मिसूरी, ईशान्येला विस्कॉन्सिन तर पूर्वेला इलिनॉय ही राज्ये आहेत. दे मॉईन ही आयोवाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


शहरे संपादन


गॅलरी संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: