सुपिरियर सरोवर
सुपिरियर सरोवर (इंग्लिश: Lake Superior; फ्रेंच: Lac Supérieur) हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी सर्वात मोठे सरोवर आहे. सुपिरियर सरोवराच्या उत्तरेला कॅनडाचा ऑन्टारियो हा प्रांत, पूर्वेला अमेरिकेचे मिनेसोटा हे राज्य तर दक्षिणेला मिशिगन व विस्कॉन्सिन ही राज्ये आहेत. पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने सुपिरियर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे (बैकाल सरोवर व टांजानिका सरोवराखालोखाल).
सुपिरियर सरोवर Lake Superior स | |
---|---|
स्थान | उत्तर अमेरिका |
गुणक: 47°42′N 87°30′W / 47.7°N 87.5°Wगुणक: 47°42′N 87°30′W / 47.7°N 87.5°W | |
प्रमुख अंतर्वाह | निपिगॉन नदी, सेंट लुईस नदी |
प्रमुख बहिर्वाह | सेंट मेरीज नदी |
पाणलोट क्षेत्र | १,२७,७०० वर्ग किमी |
भोवतालचे देश | ![]() |
कमाल लांबी | ३५० मैल (५६० किमी) |
कमाल रुंदी | १६० मैल (२६० किमी) |
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | ३१,८२० चौ. मैल (८२,४०० चौ. किमी) |
सरासरी खोली | ४८२ फूट (१४७ मी) |
कमाल खोली | १,३३२ फूट (४०६ मी) |
पाण्याचे घनफळ | २,९०० घन मैल (१२,००० किमी३) |
किनार्याची लांबी | २,७२५ मैल (४,३८५ किमी) |
उंची | ६०० फूट (१८० मी) |

सुपिरियर व इतर भव्य सरोवरे
सुमारे २०० लहानमोठ्या नद्या सुपिरियर सरोवराला पाणी पुरवतात. ह्या सरोवराचा बहिर्वाह मुख्यतः सेंट मेरीज नदीमार्गे ह्युरॉन सरोवरामध्ये होतो.

मिशिगनमधील पिक्चर्ड रॉक नॅशनल लेकशोअर
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत