बेलिंगहॅम आंतरराष्ट्रीय विमानतळ

बेलिंगहॅम आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BLIआप्रविको: KBLIएफ.ए.ए. स्थळसूचक: BLI) अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील बेलिंगहॅम शहरात असलेला विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील पश्चिम व वायव्य भागातील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय सेवा नाही. येथील बव्हंश प्रवासी अलास्का एरलाइन्स आणि अलेजियंट एरलाइन्सचा वापर करतात.