हॅरिसबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ

हॅरिसबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MDTआप्रविको: KMDTएफ.ए.ए. स्थळसूचक: MDT) अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील हॅरिसबर्ग शहरात असलेला विमानतळ आहे.

HIA ortho 2018.png

येथून पूर्व आणि ईशान्य अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय सेवा नाही. येथील बव्हंश प्रवासी अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.