कॅन्सस (इंग्लिश: Kansas) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले कॅन्सस क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २०वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २८व्या क्रमांकाचे राज्य आहे.

कॅन्सस
Kansas
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द सनफ्लॉवर स्टेट (The Sunflower State)
ब्रीदवाक्य: Ad astra per aspera
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी टोपेका
मोठे शहर विचिटा
क्षेत्रफळ  अमेरिकेत १५वा क्रमांक
 - एकूण २,१३,०९६ किमी² 
  - रुंदी ६४५ किमी 
  - लांबी ३४० किमी 
 - % पाणी ०.५६
लोकसंख्या  अमेरिकेत ३३वा क्रमांक
 - एकूण २८,५३,११६ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता १२.७/किमी² (अमेरिकेत ४०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $५०,१७७
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २९ जानेवारी १८६१ (३४वा क्रमांक)
संक्षेप   US-KS
संकेतस्थळ www.kansas.gov

कॅन्ससच्या उत्तरेला नेब्रास्का, पूर्वेला मिसूरी, पश्चिमेला कॉलोराडो, तर दक्षिणेला ओक्लाहोमा ही राज्ये आहेत. टोपेका ही कॅन्ससची राजधानी तर विचिटा हे येथील सर्वात मोठे शहर आहे. कॅन्सस सिटी ह्या नावाचे मोठे शहर वास्तविकपणे मिसूरी राज्यात असून त्याची अनेक उपनगरे कॅन्ससमध्ये मोडतात.

ऐतिहासिक काळापासून इंडियन अदिवासी समाजातील असंख्य जातींचे कॅन्सस भागात वास्तव्य राहिले आहे. सध्या कॅन्सस हे अमेरिकेमधील सर्वात मोठ्या कृषीप्रधान राज्यांपैकी एक आहे. येथे गहू, ज्वारीसूर्यफूल ह्या पिकांची मोठ्या प्रमाणावर शेती होते.

गॅलरीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: