फेडरिको फाबियान पेन्या (१५ मार्च, इ.स. १९४७:लारेडो, टेक्सास - ) हे अमेरिकेतील राजकारणी आहेत. पेन्या हे डेन्व्हरचे महापौर, कॉलोराडोच्या प्रतिनिधीगृहाचे सभासद, अमेरिकेचे वाहतूकसचिव आणि अमेरिकेचे उर्जासचिव पदावर होते.

पेन्या डेन्व्हरच्या महापौरपदी असताना त्यांच्या प्रयत्नांने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधला गेला. शहराकडून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यास त्यांचे नाव देण्यात आले आहे.