एजियन एरलाइन्स
एजियन एरलाइन्स (ग्रीक: Αεροπορία Αιγαίου Ανώνυμη Αεροπορική Εταιρεία) ही ग्रीस देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी आहे. अथेन्सजवळील अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली एजियन एरलाइन्स १९८७ साली स्थापन करण्यात आली. सध्या स्टार अलायन्स समूहाचा सदस्य असणाऱ्या एजियन एरलाइन्सद्वारे ७४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.
| ||||
हब |
अथेन्स लार्नाका थेसालोनिकी | |||
---|---|---|---|---|
मुख्य शहरे |
चानिया ऱ्होड्स हेराक्लियोन कालामाता | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | माइल्स+बोनस | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
उपकंपन्या | ऑलिंपिक एर | |||
विमान संख्या | ४७ | |||
गंतव्यस्थाने | १४५ | |||
ब्रीदवाक्य | Για κάθε μακριά που θες να φέρεις κοντά. | |||
मुख्यालय | अथेन्स, ग्रीस | |||
संकेतस्थळ | http://aegeanair.com/ |
एजियन एरलाइन्सच्या ताफ्यात केवळ एरबस कंपनीने उत्पादित केलेली विमाने असून त्यामध्ये १ ए३१९, ३८ ए३२० तर ८ ए३२१ विमानांचा समावेश आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |