एरबस ए३१९ हे एरबस कंपनीचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. एरबसच्याच ए-३२० प्रकारच्या विमानात थोडेसे बदल करून हा प्रकार तयार करण्यात आला. ए३२०पेक्षा याची प्रवासीक्षमता सातने कमी असल्याने याला ए३२०एम-७ असेही नामाभिधान प्राप्त झाले. ए३२०पेक्षा याची लांबी ३.७३ मीटरने कमी आहे. यासाठी पुढील भागातून चार आणि मागील भागातून तीन फ्रेम काढण्यात आल्या. यात सहा आपत्कालीन दरवाजे आहेत. याची इंधनक्षमता ए३२० इतकीच असून प्रवासीक्षमता १२४ (दोन वर्गांत) आहे. यामुळे याचा पल्ला वाढून ३,३५० किमी झाला आहे. शार्कलेट लावल्यावर हा पल्ला ६,८५० किमी इतका होतो.

एरबस ए३१९
2010-07-08 A319 BA G-EUOI EDDF 01.jpg

ब्रिटिश एअरवेजच्या मालकीचे एरबस ए-३१९ विमान

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश फ्रान्स, जर्मनी, इटली
उत्पादक एरबस
रचनाकार एरबस
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मूळ प्रकार एरबस ए३२०