ऑस्ट्रियन एरलाइन्स

ऑस्ट्रिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी

ऑस्ट्रियन एरलाइन्स (Austrian Airlines) ही ऑस्ट्रिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. व्हियेनाजवळील व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ऑस्ट्रियन एरलाइन्स १९५७ साली स्थापन करण्यात आली. सप्टेंबर २००९ मध्ये ऑस्ट्रियन एरलाइन्सला जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने विकत घेतले. ऑस्ट्रियन एरलाइन्स स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या ऑस्ट्रियन एरलाइन्सद्वारे देशांतर्गत ६ शहरांना तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह जगातील ५० देशांच्या ८२ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.

ऑस्ट्रियन एअरलाइन्स
Austrian Airlines Logo 2018.svg
आय.ए.टी.ए.
OS
आय.सी.ए.ओ.
AUA
कॉलसाईन
AUSTRIAN
स्थापना ३० सप्टेंबर १९५७
हब व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे ग्रात्स
इन्सब्रुक
जाल्त्सबुर्ग
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स ॲन्ड मोअर
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ८०
ब्रीदवाक्य We fly for your smile
पालक कंपनी लुफ्तान्सा समूह
मुख्यालय व्हियेना, ऑस्ट्रिया
संकेतस्थळ http://austrian.com/
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे ऑस्ट्रियन एरलाइन्सचे बोईंग ७७७ विमान

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: