स्कायटीम (SkyTeam) हा जगातील अनेक विमान वाहतूक कंपन्यांचा एक समूह आहे. इ.स. २००० साली स्थापन करण्यात आलेल्या व अ‍ॅम्स्टरडॅमच्या श्चिफोल विमानतळावर मुख्यालय असलेल्या स्कायटीममध्ये सध्या २० सदस्य आहेत. स्टार अलायन्सवनवर्ल्ड नंतर स्कायटीम ही विमान कंपन्यांनी बनवलेली तिसरी संघटना होती.

स्कायटीमचा लोगो
स्कायटीमच्या विशेष लाइव्हरीमध्ये रंगवलेले अलिटालियाचे रोम विमानतळावर उतरणारे बोइंग ७६७ विमान

स्कायटीम सदस्य कंपन्यांकडून एकत्रितपणे सध्या एकूण १७८ देशांमधील १,०६४ विमानतळांवर प्रवासी वाहतूकसेवा पुरवली जाते.

विद्यमान सदस्य

संपादन
एरोमेक्सिको, एर फ्रान्स, डेल्टा, व कोरियन एर हे चार स्कायटीमचे संस्थापक आहेत.
सदस्य विमानकंपनी कधी सामील
  एरोफ्लोत 14 April 2006
  एरोलिनिआस आर्जेन्तिनास 29 August 2012
  एरोमेक्सिको 22 June 2000
  एर युरोपा 4 September 2007
  एर फ्रान्स 22 June 2000
  अलिटालिया 13 January 2009
  चायना एरलाइन्स 28 September 2011
  चायना ईस्टर्न एरलाइन्स 21 June 2011
  चायना सदर्न एरलाइन्स 15 November 2007
  चेक एरलाइन्स 25 March 2001
  डेल्टा एरलाइन्स 22 June 2000
  गरुडा इंडोनेशिया 5 March 2014
  केन्या एरवेझ 4 September 2007
  के.एल.एम. 13 September 2004
  कोरियन एर 22 June 2000
  मिडल ईस्ट एरलाइन्स 28 June 2012
  सौदिया 29 May 2012
  तारोम 25 June 2010
  व्हियेतनाम एरलाइन्स 10 June 2010
  च्यामेन एरलाइन्स 21 November 2012

बाह्य दुवे

संपादन