एरोलिनिआस आर्जेन्तिनास

एरोलिनिआस आर्जेन्तिनास (स्पॅनिश: Aerolíneas Argentinas) ही लॅटिन अमेरिकेतील आर्जेन्टिना देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४९ साली चार कंपन्यांचे एकत्रीकरण करून ही कंपनी स्थापन करण्यात आली. एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे मुख्यालय बुएनोस आइरेस येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

एरोलिनिआस आर्जेन्तिनास
आय.ए.टी.ए.
AR
आय.सी.ए.ओ.
ARG
कॉलसाईन
ARGENTINA
स्थापना १४ मे १९४९
हब मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (बुएनोस आइरेस)
मुख्य शहरे कोर्दोबा
फ्रिक्वेंट फ्लायर Aerolíneas Plus
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या ५५१
गंतव्यस्थाने ५८
ब्रीदवाक्य Alta en el cielo (उंच आकाशात)
मुख्यालय बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना
बार्सिलोना–एल प्रात विमानतळावर थांबलेले एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे एअरबस ए३४० विमान

१९९० साली दिवाळखोरीत निघाल्यानंतर एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे खाजगीकरण करण्यात आले व तिला स्पेनच्या आयबेरियाने विकत घेतले. परंतु २००८ साली एरोलिनिआस आर्जेन्तिनासचे पुन्हा राष्ट्रीयीकरण घडले व सध्या ती आर्जेन्टिना सरकारच्या मालकीची आहे. २०१२ सालापासून एरोलिनिआस आर्जेन्तिनास स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: