ब्रसेल्स विमानतळ
(ब्रुसेल्स विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रसेल्स विमानतळ (डच: Luchthaven Brussel-Nationaal, फ्रेंच: Aéroport de Bruxelles-National) (आहसंवि: BRU, आप्रविको: EBBR) हा बेल्जियम देशाच्या ब्रसेल्स शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ब्रसेल्स शहराच्या ११ किमी ईशान्येस फ्लांडर्स भागात स्थित असलेला हा विमानतळ २०१३ साली युरोपमधील २५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.
ब्रसेल्स विमानतळ Luchthaven Brussel-Nationaal (डच) Aéroport de Bruxelles-National (फ्रेंच) | |||
---|---|---|---|
आहसंवि: BRU – आप्रविको: EBBR
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | ब्रसेल्स | ||
स्थळ | फ्लाम्स ब्राबांत प्रांत | ||
हब | ब्रसेल्स एअरलाइन्स जेट एअरवेज सौदिया कार्गो सिंगापूर एअरलाइन्स कार्गो | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १८४ फू / ५६ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 50°54′5″N 4°29′4″E / 50.90139°N 4.48444°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
01/19[१] | 9,800 | 2,987 | डांबरी |
07R/25L | 10,535 | 3,211 | डांबरी |
07L/25R | 11,936 | 3,638 | डांबरी |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | 21,933,190 | ||
मालवाहतूक (टनांमध्ये) | 453,954 | ||
विमाने | 231,528 | ||
Sources: Brussels Airport,[२] |
दुसऱ्या महायुद्धकाळामध्ये बेल्जियम नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असताना इ.स. १९४० साली नाझींनी हा विमानतळ बांधला. जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर १९४८ साली बेल्जियम सरकारने हा विमानतळ वापरण्याचे ठरवले व येथे अनेक सुधारणा केल्या. ब्रसेल्स एरलाइन्स ह्या बेल्जियमच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य वाहनतळ येथेच आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2019-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले.
- ^ "BRUtrends 2010 by Johan Bockstaele". ISSUU.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत