ब्रसेल्स एरलाइन्स
बेल्जियम देशाची विमान वाहतूक कंपनी
(ब्रसेल्स एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रसेल्स एरलाइन्स (Brussels Airlines) ही बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ब्रसेल्स एरलाइन्स २००६ साली स्थापन करण्यात आली. १९२३ साली स्थापन झालेल्या व २००१ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या सबीना एरलाइन्सची पुनर्रचना करून २००२ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स व व्हर्जिन एक्सप्रेस ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची ब्रसेल्स एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००८ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने ब्रसेल्स एरलाइन्सची ४५ टक्के भागीदारी घेतली.
| ||||
स्थापना | ७ नोव्हेंबर २००६ | |||
---|---|---|---|---|
हब | ब्रसेल्स विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | माइल्स अँड मोअर | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
विमान संख्या | ४९ | |||
गंतव्यस्थाने | ७६ | |||
ब्रीदवाक्य | We go the extra smile | |||
पालक कंपनी | लुफ्तान्सा समूह (४५%) | |||
मुख्यालय | ब्रसेल्स, बेल्जियम | |||
संकेतस्थळ | http://www.brusselsairlines.com/ |
ब्रसेल्स एरलाइन्स २००९ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या ब्रसेल्स एरलाइन्सद्वारे जगातील ७५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |