सबीना एरलाइन्स
सोसायते ॲनॉनिम बेल्ज देक्सप्लॉइटेशन देला नॅव्हिगेशन एरियेन (फ्रेंच: Societé Anonyme Belge d'Exploitation de la Navigation Aérienne; संक्षिप्त नाव: सबीना) ही १९२३ ते २००१ दरम्यान बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी होती. १९२३ साली स्थापन झालेली व ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली सबीना २००१ साली दिवाळखोरीत निघाल्यामुळे बंद करण्यात आली. २००२ साली तिची पुनर्रचना करून एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स व व्हर्जिन एक्सप्रेस ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची ब्रसेल्स एरलाइन्स कंपनी बनवली गेली.
| ||||
स्थापना | २३ मे १९२३ | |||
---|---|---|---|---|
हब | ब्रसेल्स विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | क्वालिफ्लायर | |||
विमान संख्या | ८७ (दिवाळखोरीच्या वेळी) | |||
गंतव्यस्थाने | ९९ (दिवाळखोरीच्या वेळी) | |||
ब्रीदवाक्य | Enjoy Our Company | |||
मुख्यालय | ब्रसेल्स, बेल्जियम |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |