विलेपार्ले
मुंबई उपनगरातील शेजारी, महाराष्ट्र, भारत
विले पार्ले हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. मराठी भषिक रहिवाशांचे वर्चस्व असलेल्या पार्ल्यात पार्ले-जी ह्या भारतीय बिस्किट कंपनीचा पहिला बिस्किटांचा कारखाना होता.[ संदर्भ हवा ]
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डॉमेस्टिक (आंतर्देशीय) टर्मिनल पार्ल्यामध्येच आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरून आंतरराष्ट्रीय टर्मिनसकडे जाण्यासाठी बांधलेला सहार उन्नत मार्ग देखील पार्ल्यामध्येच आहे.