पारो विमानतळ

भूटान मधील आंतरराष्ट्रीय विमानतळ

पारो विमानतळ (आहसंवि: PBHआप्रविको: VQPR) हा भूतान देशामधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पारो जिल्ह्यामध्ये दुर्गम व डोंगराळ भागात स्थित आहे. हा विमानतळ एका दरीमध्ये असून त्याच्या चारी बाजूंनी उंच पर्वतरांगा आहेत. केवळ निष्णात व कुशल वैमानिकच येथे विमान उतरवू व उड्डांणे करू शकतात. केवळ दिवसाच हा विमानतळ चालू असतो.

पारो विमानतळ
आहसंवि: PBHआप्रविको: VQPR
PBH is located in भूतान
PBH
PBH
भूतानमधील स्थान
माहिती
प्रचालक नागरी उड्डाण विभाग
कोण्या शहरास सेवा थिम्फू
हब ड्रुक एर
ताशी एर
समुद्रसपाटीपासून उंची ७,३३२ फू / २,२३५ मी
गुणक (भौगोलिक) 27°24′32″N 89°25′14″E / 27.40889°N 89.42056°E / 27.40889; 89.42056
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
15/33 1,964 6,445 डांबरी
येथे थांबलेले ड्रुक एरचे एरबस ए३१९ विमान

हा विमानतळ भारताच्या सीमा रस्ते संघटनेने १९६८ साली बांधला. ड्रुक एर ह्या भूतानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
ड्रुक एर बागडोगरा, बँकॉक, दिल्ली, ढाका, गया, गुवाहाटी, काठमांडू, कोलकाता, मुंबई, सिंगापूर
ताशी एर बँकॉक, काठमांडू, कोलकाता[]

संदर्भ

संपादन
  1. ^ JL (17 August 2013). "Bhutan Airways to Start Kolkata / Bangkok Service from October 2013; Airline Route – Worldwide Airline Route Updates". Airlineroute.net. 5 October 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन