नंदुरबार
नंदुरबार हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी (tribal ) जिल्हा आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१ च्या जनगणनेनुसार). हा भाग आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने पूर्णपणे परिपूर्ण असा आहे. येथे होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या बाजार असे म्हणतात.
नंदुरबार हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे. 'याहाकी देवमोगरा माता' हे येथील आदिवासींचे प्रमुख टोटेम (कुलदेवी) आहे. शेजारील जिल्हे फक्त - धुळे
विभाग
संपादननंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी (महाल/धडगाव), तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर असे ६ तालुके आहेत.
भूगोल
संपादनसातपुडा पर्वताच्या रांगेत हे गाव वसलेले आहे. येथे पाताळगंगा नावाची नदी आहे.
सातपुड्यातील तापी खोऱ्यात वसलेला नंदुरबार हा राज्यातील अति उत्तरेकडील जिल्हा.(नाशिक प्रशासकीय विभागात.)
तापी नर्मदा ही मुख्य नदी. (इतर नद्या - नर्मदेश्वर उपनद्या उदई, देवनंद, आहेत गोमाई, पाताळगंगा, रंगवली, शिवण, वगैरे.)
मोलगी: सातपुडा पर्वतातील पर्यटकांना आकर्षित करणारा प्रसिद्ध बोरकी धबधबा हा देवनंद नदीवर उमटी गावात आहेत.
इतिहास
संपादनहजारो वर्षांपूर्वी तापी व रेवा (नर्मदा)नदीच्या मध्ये दाब नावाचे राज्य होते. आजही तो परिसर हेलोदाब म्हणून ओळखले जाते. तेथे राजाकोलपासा याचे राज्य होते. दाब राज्याच्या भोवताली असलेल्या प्रमुखांना एकत्र आणून त्यानी मोठे राज्य स्थापन केले होते. त्याभागातील ताब्यात असलेल्या भुभागाला पाटी (खोंड) म्हणून ओळखले जात असे. दाब या सांस्कृतिक केंद्रस्थाना पासून भोवताली चारही दिशांना आदिवासी बोली भाषेत खोंड (पाटी) म्हणून ओळखतात.त्याना नांवेही दिली आहे.[१] 'याहा देवमोगरा माता' हे येथील आदिवासींचे प्रमुख टोटेम कुलदेवी आहे. आदिवासी भाषेत याहा म्हणजे आई म्हणून देवमोगरा माता. नंदुरबार पूर्वी नंद्राज राजाचे राज्य होते, त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात होते. येथील प्रमुख आदिवासींचा खूब मोठा इतिहास नंदुरबारला लाभला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा देताना इथे १९४२ साली शिरीष कुमार नावाचा नवयुवक सत्याग्रहादरम्यान पोलिसांची गोळी लागून हुतात्मा झाला. त्याच्या नावाने गावात हुतात्मा चौक आहे. नंदुरबार शहरालगत चौपाळे नावाचे एक खेडेगाव आहे. या गावात "संत दगाजी बापू" यांचा झाला. आजन्म ब्रह्मचारी राहून त्याने नंदुरबारला भक्तीचा मार्ग दर्शविला. लोक त्यांना 'बापू' म्हणूनच ओळखायला लागले. त्यांची कीर्ती उत्तर महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या तीनही राज्यात पसरलेली आहे.
शिक्षण
संपादन- एकलव्य विद्यालय,
- श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल,
- डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल,
- नंदुरबार तालुका विधायक समितीचे (NTVSचे) G.T.P.(गजमल तुळशीराम पाटील) कॉलेज,
- यशवंत विद्यालय,
- श्रीमती हिराबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल इत्यादी शाळा नंदुरबारमध्ये आहेत.
- येथे टिळक वाचनालय प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवरायांचा पुतळा
संपादननंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता. परंतु पालिकेने जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल उभारल्याने हा पुतळा पालिकेच्या तत्पुरत्या इमारतीत एका बंदिस्त खोलीत ठेवला होता. नंतर तो मोकळ्या जागेत आणण्यात आला.
देवालये
संपादन- मोलगी - दाब (हेलोदाब दाबमंडल) थंड हवेचे ठिकाण व आदिवासी ची कुलदेवी यहाकी "याहा मोगी माता" Archived 2024-02-22 at the Wayback Machine. मंदिर आहेत.
- खापर - देवमोगरा मंदिर Archived 2024-02-22 at the Wayback Machine.
- मालदा मोगरा येथील आदिवासी देवी मंदिर
- रानजांपूर येथील आदिवासी संत गुलाम बाबा आश्रम
- म्हसवड - उनदेव (गरम पाण्याचा झरा)
- तोरणमाळ (थंड हवेचे ठिकाण 1100 मीटर उंची ) यशवंत तलाव - तोरणादेवी मंदिर
- सातपुडा पर्वत - आस्तंभा Archived 2024-02-22 at the Wayback Machine. ऋषी (फक्त दिवाळीला भेट देता येते) नंदूरबार जिल्हातील सातपुडयाच्या अस्तंबाचा Archived 2024-02-22 at the Wayback Machine. उल्लेखनीय माहिती
- दंडपाणेश्वर गणपती मंदिर - शेंदूर लावलेली मुर्ती असून हे देवस्थान जागृत आहे, अशी कलपना आहे..
- नीलकंठेश्वर महादेव मंदिर - पुरातन महादेवाचे मंदिर काळ्या पाषाणातले असून तांब्याची पिंड आहे
- जोगेश्वरी देवी माळीवाडा - हे येथील ग्राम दैवत अर्थात गाव देवीचे मंदिर आहे.
- मोठा मारुती - साडेसाती मध्ये येथे अनेक लोक दर्शनास येतात.
- खोडाई माता - कथा - तापी नदीचे पाणी एका रात्रीत आणून सूर्योदयाच्या आत माझे मंदिर बांधा असा आदेश देवीने दिला. परंतु हे शक्य झाले नाही. तेव्हा देवीनेच झोपून आपल्या शरीराने पाणी अडवले. यामुळे हे स्थान प्रसिद्ध झाले.
- वाघेश्वरी देवी - टेकडीवर असलेले देवालय
- सातपुड्यातील धडगाव तिनसमाळ पहिलं आदिवासी संग्रहालय आहे
थंड हवेची ठिकाणे
संपादन- तोरणमाळ (ता.धडगाव)
- मोलगी - डाब ता. अक्कलकुवा
- तिनसमाळ (ता.धडगाव)
पर्यटन (प्रमुख स्थळे)
संपादननंदुरबार- प्रमुख आदिवासी सुसंस्कृती, जीवनशैली
बाल हुतात्मा शिरीषकुमार याचे स्मारक. प्रकाशे -शहादा तालुक्यात तापी-गोमाई संगमावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ( दक्षिण काशी )
मोलगी - गाव उमटी येथे देवनंद नदीवर पर्यटकांना आकर्षित करणारा बोरकी धबधबा व बोरकी खोलदरी दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.
शहादा तालुक्यात उनबदेव येथे गरम पाण्याचे झरे. अक्राणी तालुक्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण.येथे यशवंत तलाव ,सिताखीची दरी, पार्क, निसर्ग व धबधबा आहे. आदिवासी संस्कृती आणि खूप काही अक्कलकुवा येथे होराफली धबधबा अक्ककलकुुवा तालुक्यातील उमटी गावात देवनंद नदीवर पर्यटकांना आकर्षित करणारा बोरकी धबधबा आहे. मोलगी येथील काठीची आदिवासी संस्कृती होळी,तसेच जामली येथे देखील होळी मेलादा प्रसिद्ध आहेत. सातपुडा डोंगर रांगा, वन्यजीव, आणि निसर्ग सातपुडा प्रदेशमधील आदिवासी सुसंस्कृती आणि मनमोहक खेडी. हिडिंबा जंगल. परिसरात घेतल्या जाणाऱ्या मिरचीसाठीची नंदुरबार ही मोठी बाजारपेठ आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "देवमोगरा माता माहिती | Devmogra Mata jANKARI hINDI | देवमोगरा माता कहानी गुजराती". Adivasi TV India. 2022-08-23 रोजी पाहिले.[permanent dead link]